Join us  

विवेक ओबेरॉयच्या भरदार मिशीने सेटवर लावले वेड!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2018 1:38 PM

लहान मुलांमधील अभिनयगुणांचा शोध घेणाऱ्या ‘झी टीव्ही’वरील ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ’ या अत्यंत लोकप्रिय आणि प्रतिष्ठेच्या कार्यक्रमाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रसारण आता दर शनिवार-रविवारी सुरू झाले आहे.

ठळक मुद्देया कार्यक्रमाच्या सेटवर परीक्षक विवेक ओबेरॉय याची बरीच चर्चा सुरू आहे

लहान मुलांमधील अभिनयगुणांचा शोध घेणाऱ्या ‘झी टीव्ही’वरील ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ’ या अत्यंत लोकप्रिय आणि प्रतिष्ठेच्या कार्यक्रमाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रसारण आता दर शनिवार-रविवारी सुरू झाले आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वीच्या आवृत्त्यांमध्ये अनेक बालकलाकारांतील अभिनयगुण टिपण्यात आले आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आल्यामुळे त्यांनी चित्रपट क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटविला आहे. आता या तिसऱ्या आवृत्तीत अनेक नव्या नौटंकी बच्च्यांना अभिनेता विवेक ओबेरॉय, अभिनेत्री हुमा कुरेशी आणि उमंगकुनार यांचे मौलिक मार्गदर्शन लाभत आहे. या बालस्पर्धकांनी सादर केलेल्या नाटकांमुळे प्रेक्षकांना निखळ करमणूक होत आहे.

या कार्यक्रमाच्या सेटवर परीक्षक विवेक ओबेरॉय याची बरीच चर्चा सुरू आहे. गेल्या तीन आवृत्त्यांमध्ये तो बालस्पर्धकांचा परीक्षक म्हणून काम बघत आहे. मग त्याची आत्ताच चर्चा कशाबद्दल होत आहे? तुम्हाला काही कल्पना आहे का? त्याचे कारण त्याने गेल्या काही दिवसांत स्वत:चे बदललेले रूप हे आहे. केवळ बालस्पर्धकच नव्हे, तर त्यांच्या मातांनाही विवेकच्या भरदार मिशीने वेड लावले आहे. सर्वजण त्याच्या या मिशीबद्दलच बोलत असतात. या भरदार मिशीतील त्याचे हे रूप इतके लोकप्रिय झाले आहे की दुसऱ्या परीक्षकांनी ही मिशी विवेकला शोभून दिसते की नाही, या मुद्द्यावर प्रेक्षकांची जनमत पाहणीही केली होती! बहुसंख्य मातांचे मत या शैलीदार मिशीमुळे विवेक देखणा आणि स्टायलिश दिसतो, असे होते, तर बालस्पर्धकांच्या मते या मिशीमुळे तो आता वयाने मोठा वाटतो. “माझी मिशी ही इतरांच्या चर्चेचा भाग झाली आहे, हे पाहून मला गंमत वाटली. पण या स्पर्धकांच्या मातांना माझा हा नवा लूक आवडला, ते पाहून मला बरं वाटलं. त्यामुळे हा कार्यक्रम संपेपर्यंत तरी मी ही मिशी कायम ठेवणार आहे,” असे विवेकने सांगितले.

मिशी असो की नसो, हिंदी चित्रपट क्षेत्रांत विवेक ओबेरॉय हा एक स्टायलिश हिरो मानला जातो. ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ’च्या सेटवर तर तो सर्वांचा लाडका परीक्षक बनला आहे.

टॅग्स :विवेक ऑबेरॉयहुमा कुरेशी