Join us  

​हर मर्द का दर्द या मालिकेत रब ने बना दी जोडीसारखा होणार फैसल रशिदचा मेकओव्हर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2017 8:54 AM

हर मर्द का दर्द ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले आहेत. या मालिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. ...

हर मर्द का दर्द ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले आहेत. या मालिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. या मालिकेचे दिग्दर्शन परमीत सेठी करत आहे. परमीतने दिलजले, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे यांसारख्या चित्रपटात काम केले आहे तर बदमाश कंपनी या चित्रपटाचे दिग्दर्शक केले आहे. हर मर्द का दर्द  या मालिकेच्या आधी त्याने सुमीत संभाल लेगा या मालिकेचे दिग्दर्शन केले होते. या मालिकेतील फैसल रशिदची व्यक्तिरेखा काहीशी रब ने बना दी जोडी या चित्रपटातील शाहरुखवर बेतलेली आहे. या मालिकेत फैसल आपल्याला अतिशय साध्या सुध्या वेशभूषेत पाहायला मिळतो. पण आता मालिकेत त्याचा मेकओव्हर होणार आहे. तो त्याची साधीसुधी इमेज सोडून आता मॉडर्न बनणार आहे. तो आताच्या फॅशनप्रमाणे मॉडर्न कपडे घालणार आहे तसेच स्पाईकची हेअरस्टाइलदेखील करणार आहे. त्याने या मेकओव्हरनंतरच्या भागांचे चित्रीकरण होण्याआधीच नुकताच रब ने बना दी जोडी हा चित्रपटदेखील पाहिला. रबने बना दी जोडीमध्ये शाहरुख आपली पत्नी अनुष्का शर्माचे मन जिंकण्यासाठी मेकओव्हर करतो असे दाखवण्यात आले होते त्याचप्रमाणे आता या मालिकेत फैसल त्याची पत्नी जिनल बेलानीचे मन जिंकण्यासाठी मेकओव्हर करणार आहे. याबाबत फैसल सांगतो, "शाहरुख खानचा मी खूप मोठा फॅन आहे. या मालिकेत ज्या वेळी रबने बना दी जोडी या चित्रपटातील शाहरुखप्रमाणे माझा मेकओव्हर करण्यात येणार असल्याचे मला सांगण्यात आले त्यावेळी मी खूप खूश झालो होतो. शाहरुखचा अभिनय, त्याची स्टाईल, त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा मी चाहता आहे."