Join us  

कोरोनाकाळातही कलाकार पोहोचले चाहत्यांच्या घरी, पण कसे ? त्यामागे ही आहे भन्नाट टेक्निक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2021 2:30 PM

This Is How Star Pravah Actors Reached fans at their home :स्टार प्रवाहवरील सगळ्याच मालिकांना प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. अनिरुद्ध-अरुंधती, जयदीप-गौरी, सौंदर्या इनामदार, नंदिनी शिर्केपाटील, अंजी पश्या, दीपा कार्तिक, शुभम कीर्ती ही सगळीच पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करत आहेत.

आपल्या आवडत्या कलाकारासह फोटो काढावा, सेल्फी काढावा किंवा ऑटोग्राफ मिळावा अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. त्या क्षणासाठी रसिक काहीही करायला तयार असतात. त्यामुळे कलाकारांनाही आपली रसिकांमध्ये असलेली लोकप्रियता कळून येते. त्यामुळे कलाकार मंडळी यासाठी मोठ्या आनंदाने तयार होतात. मात्र कोरोनाकाळात कलाकारामंडळीही चाहत्यांपासून दूरावले गेले आहेत. कुठे दिसले तरी लांबूनच फोटो देताना दिसतात. मात्र स्टार प्रवाहाचे लोकप्रिय कलाकारांनी चाहत्यांना भेटण्यासाठी एक भन्नाट शक्कलच शोधून काढली आहे. या भन्नाट टेक्नॉलॉजीमुळे कलाकार मंडळी मनसोक्त चाहत्यांना भेटू शकतील.

 

छोट्या पडद्यावरील कलाकारांची लोकप्रियता अधिक असते. घरातील प्रत्येक व्यक्ती आपापल्या आवडत्या मालिका पाहत असतो. मालिकेत काम करणारे कालाकारही आपल्या कुटुंबाचा एक भागच मानतो. तसे तर ऑनस्क्रीन मालिकेच्या रुपात चाहते त्यांच्या लाडक्या मालिकांमधील कलाकारांना दररोज भेटत असतात. पण या कलाकारांची प्रत्यक्ष भेट व्हावी ही इच्छा प्रत्येक चाहत्याच्या मनात असते. 

 

कोरोनाच्या संकटामुळे प्रत्यक्ष भेट घेणं शक्य नसल्यामुळे स्टार प्रवाहने चाहत्यांसाठी एक अनोखी संधी उपलब्ध करुन दिली. ऑगमेंटेड रिऍलिटी या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने चाहत्यांना घरबसल्या स्टार प्रवाहच्या परिवाराला आभासी भेटता आला इतकंच नाही तर या परिवारासोबतच्या भेटीचा क्षण कॅमेऱ्यामध्ये कैदही करण्यात आला. मराठी टेलिव्हिजनवर असा प्रयोग आजवर झालेला नाही. त्यामुळे चाहत्यांकडून या अनोख्या उपक्रमाचं कौतुक होत आहे.

 

स्टार प्रवाहवरील सगळ्याच मालिकांना प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. अनिरुद्ध-अरुंधती, जयदीप-गौरी, सौंदर्या इनामदार, नंदिनी शिर्केपाटील, अंजी पश्या, दीपा कार्तिक, शुभम कीर्ती ही सगळीच पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करत आहेत. त्यामुळे स्टार प्रवाहच्या परिवाराच्या या आभासी भेटीचा आनंद म्हणजे चाहत्यांसाठी अनोखी पर्वणी ठरली. येत्या ४ तारखेला स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा रंगणार आहे. त्यामुळे चाहतेही या स्टार परिवाराचा एक भाग बनले आहेत. 

टॅग्स :स्टार प्रवाह