Join us

अखेर तारीख ठरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2016 12:56 IST

दिया और बाती हम ही मालिका संपणार असल्याची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा आहे. पण ही मालिका कधी संपणार याविषयी ...

दिया और बाती हम ही मालिका संपणार असल्याची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा आहे. पण ही मालिका कधी संपणार याविषयी लोकांमध्ये संभ्रम होता. पण आता ही मालिका कधी संपवायची हे निर्माते आणि वाहिनीने ठरवले आहे. या मालिकेचा शेवटचा भाग 11 सप्टेंबरला दाखवला जाणार असल्याचे म्हटले जात आहे. मालिकेत प्रेक्षकांना एक गोड शेवट पाहायला मिळणार आहे. या मालिकेला जवळजवळ 5 वर्षं झाली आहेत. या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारे अनस रशिद आणि दीपिका सिंग या दोघांनीही प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले. या मालिकेची ही लोकप्रियता पाहाता या मालिकेचा दुसरा सिझन सुरु करण्याचा प्रोडक्शन हाऊसचा विचार असल्याची चर्चा आहे.