Join us  

'जिजाजी छत पर है' या मालिकेला मिळणार हे वळण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2018 6:30 AM

'जिजाजी छत पर है' ही मालिका प्रेक्षकांना भावनिक रोलर-कास्‍टर राइडवर घेऊन जाण्‍यास सज्‍ज झाली आहे. ईलायची (हिबा नवाब) पंचमसाठी (निखिल खुराणा) करवाचौथ व्रत करणार आहे. 

सोनी सबवरील 'जिजाजी छत पर है' या मालिकेने आपल्‍या रोमांचकारी पटकथांसह प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता ही मालिका प्रेक्षकांना भावनिक रोलर-कास्‍टर राइडवर घेऊन जाण्‍यास सज्‍ज झाली आहे. ईलायची (हिबा नवाब) पंचमसाठी (निखिल खुराणा) करवाचौथ व्रत करणार आहे. 

पहाटेच्‍या वेळी ईलायचीला पंचमला बंदुकीची गोळी लागल्‍याचे स्‍वप्‍न पडते. या स्‍वप्‍नामुळे घाबरून गेलेली ईलायची त्‍याच्‍यासाठी 'करवाचौथ व्रत' करण्‍याचे ठरवते. ती संपर्ण दिवसभर तिच्‍या हातावर 'दिवा' ठेवते. पंचमला हे सर्व समजल्‍यानंतर त्याला प्रचंड भीती वाटते. तो ईलायचीला सांगतो की, त्‍याच्‍या 'कुंडली'नुसार त्‍याच्‍यासाठी हे 'व्रत' करणाऱ्या महिलेला मृत्‍यूचा धोका असेल. पण ईलायची याकडे दुर्लक्ष करते. यादरम्‍यान ती छोटेला त्‍याचा व्‍यवसाय वाढवण्‍यामध्‍ये मदत करण्‍याचे ठरवते. ती 'सत्‍यवान-सावित्री' नाटकाचे आयोजन करते, जेथे ती तिचा उपवास मोडू शकेल. या नाटकासोबतच एका गुन्‍हेगाराला तुरुंगातून सोडण्‍यात येते. हा गुन्‍हेगार पंचमचा फोटो जाळतो आणि त्‍याच्‍याप्रती असलेले शत्रुत्‍व दाखवतो. हा गुन्‍हेगार पंचमला धडा शिकवण्‍याचे ठरवतो. ईलायचीचे स्‍वप्‍न खरे होईल का? ती स्‍वत:चे आणि पंचमचे रक्षण करेल का? याची उत्तरे प्रेक्षकांना 'जिजाजी छत पर है' या मालिकेच्या आगामी भागांमध्ये मिळणार आहेत.

'जिजाजी छत पर है' या मालिकेच्या या नव्या ट्रकविषयी ईलायचीची भूमिका साकारणरी हिबा नवाब सांगते, ''या मालिकेतील प्रत्‍येक एपिसोडमध्‍ये एक नवीन रोमांच असतो. या मालिकेमध्‍ये काम करण्‍याचा आतापर्यंतचा माझा अनुभव खूपच चांगला आहे. या मालिकेचा आगामी एपिसोड रहस्‍यमय आणि भावनिक असणार आहे. ईलायची पंचमच्‍या दीर्घायुष्‍यासाठी 'करवाचौथ व्रत' करणार आहे.'' 

पंचमची भूमिका साकारणारा निखिल खुराणा सांगतो, ''सोनी सबवरील मालिका 'जिजाजी छत पर है'मध्‍ये पंचमची भूमिका साकारताना खूप मजा येत आहे. तसेच मालिकेला देशभरातील प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आगामी भागांमध्ये आमच्‍या प्रेक्षकांना मजेशीर ट्रीट मिळणार आहे. त्‍यांना एक मस्त धक्‍का लागणार आहे. प्रेक्षकांना हा भाग नक्कीच आवडेल अशी मला खात्री आहे.''  

टॅग्स :जिजाजी छत पर है