Join us  

​‘डीआयडी लिटिल मास्टर्स’मध्ये ‘लुंगी डान्स’च्या तालावर थिरकणार चित्रांगदा सिंह!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 11:12 AM

झी टीव्हीवरील लहान मुलांमधील नृत्यकौशल्याचा शोध घेणाऱ्या ‘डीआयडी लिटिल मास्टर्स’ या रिअॅलिटी कार्यक्रमात गेल्या अनेक आठवड्यांपासून ब्लॉकबस्टर बच्चे आपल्या ...

झी टीव्हीवरील लहान मुलांमधील नृत्यकौशल्याचा शोध घेणाऱ्या ‘डीआयडी लिटिल मास्टर्स’ या रिअॅलिटी कार्यक्रमात गेल्या अनेक आठवड्यांपासून ब्लॉकबस्टर बच्चे आपल्या अप्रतिम नृत्यकौशल्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत आहेत. आता आगामी भागांत हे ब्लॉकबस्टर बच्चे आपल्या बहारदार नृत्याविष्काराने चित्रांगदा सिंग, सिद्धार्थ आनंद आणि मार्झी पेस्तनजी या परीक्षकांवर आपला प्रभाव टाकतील आणि टॉप 10च्या गटात आपला समावेश करण्याचा प्रयत्न करतील.येत्या वीकेण्डला चित्रांगदा सिंग प्रेक्षकांना एक वेगळ्या वेशभूषेत दिसणार आहे. ती चक्क लुंगी नेसून आपल्या मद्रासी नृत्याविष्काराने प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. या कार्यक्रमादरम्यान स्पर्धक सूर्याच्या वडिलांनी चित्रांगदा सिंगबरोबर लुंगी डान्स गाण्याच्या तालावर नृत्य करण्याचे आपले स्वप्न बोलून दाखवले होते. चित्रांगदाने आनंदाने ही विनंती स्वीकारली आणि लुंगी नेसून त्यांच्याबरोबर तिने या गाण्यावर नृत्यही सादर केले. लुंगी नेसल्यावरही कोठेही न अडखळता चित्रांगदाने अतिशय सफाईदारपणे नृत्य सादर करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले.डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स या कार्यक्रमाने तुफान लोकप्रियता मिळविली असून या कार्यक्रमामुळेच फैझल खान, हरप्रीत, जीतूमणी, तेरिया मगर आणि राजस्मिता कार हे कलाकार आज प्रसिद्ध नर्तक म्हणून ओळखले जातात. यापैकी प्रत्येक कलाकाराने नृत्याच्या क्षेत्रात स्वत:ची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली असून मनोरंजनाच्या क्षेत्रात ते नामवंत झाले आहेत.‘हजारो ख्वाईशें ऐसी’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत चित्रांगदा सिंहने पदार्पण केले. या चित्रपटातील अभिनयाबद्दल तिने समीक्षकांकडून प्रशंसा मिळवलेली आहे. त्यानंतर अक्षय कुमारच्या ‘देसी बॉईज’ या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे देखील कौतुक झाले होते. तिने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये भूमिका रंगविल्या असून आओ राजा आणि काफिराना यांसारख्या काही तुफान गीतांवरही ती थिरकली आहे. आपले सौंदर्य, संवेदनशील अभिनयकला आणि नृत्यकौशल्याने तिने रसिक प्रेक्षकांवर आपली मोहिनी घातली आहे. या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका बजावण्याचा तिचा अनुभव खूपच चांगला असल्याचे ती सांगते. या कार्यक्रमात तिचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. Also Read : टायगर श्रॉफने डीआयडी लिटिल मास्टर्स या कार्यक्रमातील स्पर्धकांच्या आईंसोबत धरला ताल