करण करतोय माधुरीला मिस
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2016 15:21 IST
झलक दिखला जा या कार्यक्रमात सध्या करण जोहर परीक्षकाची भूमिका साकारत आहे. या कार्यक्रमात जॅकलिन फर्नांडिस, गणेश हेगडे त्याच्यासोबत ...
करण करतोय माधुरीला मिस
झलक दिखला जा या कार्यक्रमात सध्या करण जोहर परीक्षकाची भूमिका साकारत आहे. या कार्यक्रमात जॅकलिन फर्नांडिस, गणेश हेगडे त्याच्यासोबत परीक्षक आहेत. करणने माधुरी दिक्षितसोबत झलकच्या अनेक सिझनचे परीक्षण केले आहे. गेल्या दोन सिझनपासून माधुरी या कार्यक्रमाचा भाग नाहीये. माधुरी या कार्यक्रमात नसल्याने मी तिला खूप मिस करतोय असे करण सांगतो. माधुरीची एनर्जी, तिचे हास्य हे सगळे मी मिस करत असल्याचेही करण सांगतो.