Join us  

मौनी रॉयला नाही करायचेय हे काम? पूर्वी याच कामामुळे मिळवली होती लोकप्रियता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 10:32 AM

छोटा पडदा गाजवल्यानंतर आता अक्षयकुमारच्या 'गोल्ड' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार एंट्री करणारी मौनी रॉय टीव्ही मालिका करणार नसल्याचे कळतंय. ...

छोटा पडदा गाजवल्यानंतर आता अक्षयकुमारच्या 'गोल्ड' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार एंट्री करणारी मौनी रॉय टीव्ही मालिका करणार नसल्याचे कळतंय. सध्या ती सगळी मेहनत बॉलिवूडवर केंद्रीत करतेय. छोट्या पडद्यावर 'देवों के देव महादेव' मालिकेत पार्वती ही भूमिका साकारण्याची संधी लाभली त्यामुळे ती स्वतःला नशिबवानही समजते.सध्या मौनीला अनेक टीव्ही मालिका आणि पौराणिक मालिकांसाठीही ऑफर्स येत आहेत. मात्र आता तिला सिनेमा करण्यासाठी वेळ द्यायचा आहे. यासाठी तिच्याकडे येणा-या  अनेक टीव्ही ऑफर्सना नकार दिला आहे. ठराविक  भागांची मालिका किंवा रिअॅलिटी शो असणार तरच करणार असल्याचे कळतंय. 'बिग बॉस11' च्या प्रोमोमध्ये मौनी झळकत आहे.ज्या शोमध्ये तिला फार वेळ द्यावा लागणार नाही अशाच ऑफर्स स्विकारणार असल्याचे मौनीने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे.आज मी जे काही आहे, जे काही मला यश मिळाले आहे ते पार्वती भूमिकेमुळेच मिळाले आहे. रसिकांना माझी भूमिका आजही  लक्षात आहे याचा मलाही आनंद आहे. मी सगळ्यात मोठी पौराणिक भूमिका साकारली होती हेसुद्धा मी मानते. मात्र पुन्हा एकदा मला एखाद्या पौराणिक भूमिकेत स्वीकारणे रसिकांनाही कठीण जाईल असे मला वाटते असे मौनी रॉयने म्हटले आहे.टिव्ही वर अशा भूमिकांनी प्रसिद्ध झालेली मौनी, तिच्या रियल लाइफमध्ये मात्र मस्तीखोर आणि बिनधास्त आहे. तिच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरून आपल्याला याचा अंदाज येतो. अनेकदा विविध फोटोशूटनेही ती चर्चेत असते.आता मौनी रॉयची इमेजही बदलली आहे.त्यामुळे त्यामुळे मौनीला मालिकांमध्ये अडकून न राहता सिनेमासाठी काम करायचे आहे. काहीही झाले तरी पौराणिक मालिकांमध्ये काम करायचे नाही असे तिने ठरवले आहे.पौराणिक मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेली मौनी रॉय आता बॉलिवूडमध्ये हिरोईन बनत आपली नवी ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्न करत आहे. पौराणिक मालिका केल्यानंतर मौनीला नागिन या मालिकेसाठी भूमिका मिळाली. या मालिकेमुळे तिला छोट्या पडद्यावरची नागिन म्हणून ओळखली जाते मात्र आता ती नागिन नाहीतर आता बॉलिवूडची हिरोईन म्हणून लोकप्रियता मिळवायची आहे.  Also Read:मौनी रॉयसाठी ही भूमिका ठरली टर्निंग पॉईंट?जाणून घ्या त्या भूमिकेविषयी