Join us  

'तुझेच गीत गात आहे' मालिकेतील छोट्या स्वराला ओळखलंत का?, याआधी केलंय या मालिकेत काम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2022 4:55 PM

Tuzech Geet Gaat Aahe: 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत गाण्याचं स्वप्न उराशी बाळगून असलेल्या स्वराची ही कहाणी आहे.

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवर लवकरच एक नवी मालिका दाखल होत आहे. 'तुझेच मी गीत गात आहे' (Tuzech Mi Geet Gaat Aahe) ही नवीन मालिका येत्या २ मे २०२२ पासून रात्री ९ वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या नव्या मालिकेतून अभिनेत्रीचे तब्बल १२ वर्षांनी पुनरागमन होत आहे. ही अभिनेत्री म्हणजे उर्मिला कोठारे (Urmila Kothare). नुकताच या नव्या मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ज्यात उर्मिला कोठारे स्वराच्या आईची म्हणजेच वैदेहीची भूमिका साकारताना दिसणार आहे. या मालिकेतील ही बालकलाकार कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत गाण्याचं स्वप्न उराशी बाळगून असलेल्या स्वराची ही कहाणी आहे. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वरा आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत आहे. मात्र आपला बाप कोण? या प्रश्नाचे उत्तर माहीत नसलेल्या स्वराला याचा उलगडा कधी होणार हे मालिकेतून पाहायला मिळणार आहे. मालिकेत आणखी कोणकोणते कलाकार झळकणार आहेत हे गुलदस्त्यात ठेवण्यात आले होते. मात्र याबाबत नुकताच एक उलगडा करण्यात आला आहे.

तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत स्वराची भूमिका अन्वी तायवडे या बालकलाकाराने साकारली आहे. अन्वी याअगोदर हिंदी मालिकेतून झळकली आहे. स्टार प्लसवरील ‘ये है चाहतें’ या मालिकेत अन्वीने साचीची भूमिका साकारली होती.

सास बहू और साजीश , स्टोरी ९ मंथस की अशा हिंदी मालिकांमधून अन्वीला महत्वाच्या भूमीका साकारण्याची संधी मिळाली आहे. हिंदी टेलिव्हिजन गाजवल्यानंतर अन्वी आता मराठी मालिकांकडे वळली आहे. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत ती मध्यवर्ती भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अन्वीसाठी ही मालिका खूप खास ठरणार आहे. 

टॅग्स :उर्मिला कानेटकर कोठारेस्टार प्रवाह