Join us  

अभिनय सोडून शेती करतोय हा लोकप्रिय अभिनेता,या कारणामुळे घेतला हा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2018 1:59 PM

पहिल्या सिझनला जितके प्रेम मालिकेला मिळाले तिकतके प्रेम दुस-या पर्वाला मिळु शकले नाही.त्यामुळे या मालिकेलाही लवकरच गाशा गुंढाळावा लागला होता.

'दीया और बाती हम' मालिकेतून घराघरात पोहचलेला  सूरज राठी अर्थात अनस राशिद गेल्या दोन वर्षापासून इंडस्ट्रीपासून लांब आहे. ही मालिका संपल्यानंतर तोही नवीन भूमिकेतून रसिकांच्या भेटीला येणार अशा चर्चा होत्या.मात्र तो छोट्या पडद्यावर पुन्हा झळकलाच नाही. गेल्याच वर्षा अनस रशिद विवाह बंधनात अडकला होता.त्यामुळे तो त्याची मॅरिड लाइफ  एन्जॉय करतोय. अभिनयाव्यतिरिक्त तो काय करतोय असे अनेक प्रश्न पडला असणार ख-या आयुष्यात शेतकरी बनला आहे.होय,ग्लॅमरच्या दुनियेपासून लांब जात तो शेती करण्यात बिझी आहे.

नुकताच अनसचा एक फोटो समोर आला आहे.त्या फोटोत दूरवर पसरलेली शेती पाहायला मिळत आहे. शेतात तो काम करत असून शेतात काम करणे त्याला खूप आवडते असल्याचे म्हटले आहे.मुळात अॅक्टींगमध्ये येण्याआधी तो शेतीच करत होता.त्यामुळे अॅक्टींग हे त्याचे दुसरे प्रोफेशन असून शेतीलाच  त्याने  नेहमी प्राधान्य देतो.पंजाबच्या याच मातीत काम करण्याची त्याची इच्छा आहे.म्हणूनच गेल्या दोन वर्षापासून तो एकही मालिकेत झळकलेला नाही.अभिनयात व्यस्त असल्याने अनसला शेतीकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता.त्यामुळे त्याने ऑफर्स मिळत असतानाही स्विकारल्या नाहीत. गेल्या काही वर्षांपासून अनस सेंद्रीय शेती करत आहे. याशिवाय सेंद्रीय उत्पादन वापराला अनस प्रोत्साहन देत आहे. एकदा सेंद्रीय पदार्थ खाण्याची आवड निर्माण झाली की केमिकलयुक्त पदार्थ तुम्ही विसराल असं अनसला वाटतं. त्यामुळे सेंद्रीय शेतीसारखं हटके काम करत अनसने अनोखा आदर्श निर्माण केला आहे असं म्हटल्यास वावगं ठरु नये. 

'दिया और बाती हम' ही मालिका सुपरहिट ठरली होती.मालिकेची लोकप्रियता बघता 'दिया और बाती हम' या मालिकेचं दुसरं पर्व रसिकांच्या भेटीला आणण्यात आले होते. नवीन पर्वात  ब-याच गोष्टी नव्या पाहायला मिळाल्या.मात्र यांत अनस रसिद आणि दीपिका सिंग हीच जोडी रसिकांना पाहाण्याची इच्छा होती. मात्र तसे झाले नाही आणि नव्या चेह-यांना संधी देण्यात आली.पहिल्या सिझनला जितके प्रेम मालिकेला मिळाले तिकतके प्रेम दुस-या पर्वाला मिळु शकले नाही.त्यामुळे या मालिकेलाही लवकरच गाशा गुंढाळावा लागला होता.