Join us  

Shocking! 'दयाबेन' दिशा वकानीने 'तारक मेहता का उल्टा' मालिकेला कायमचा ठोकला रामराम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 12:04 PM

दिशा वाकानीने या शोला कायचमा निरोप दिला आहे.

'तारक मेहता का उल्टा चश्मा'चे चाहते दिशा वाकानी या कार्यक्रमात परत कधी येणार हे जाणून घेण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून वाट पाहत आहेत . दिशा वाकानी 2017 मध्ये शोमधून मॅटरनिटी लीव्हवर गेली आणि तेव्हापासून 'तारक मेहता ...' मध्ये परत आली नाही.

आता बातमी समोर येत आहे दिशा वाकानीने या शोला कायमचा निरोप दिला आहे. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मध्ये दयाबेन परत येणार नाही. 'कोईमोई'च्या रिपोर्टनुसार, मॅटरनिटी लीव्हवरनंतर मेकर्स आणि दिशा वाकानीमध्ये शोमध्ये येण्यासाठी चर्चा सुरु होती. निर्माते दिशा वाकानीशी काही गोष्टींबद्दल चर्चा करीत होते, परंतु काही कारणांमुळे ही चर्चा निष्फळ ठरली. याच कारणास्तव दिशा वाकाणी 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधून कायमचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून अशी चर्चा रंगली होती की दयाबेन शोमध्ये परत येईल. असे म्हटले जाते की 2019 मध्ये दिशा वाकाणीनेदेखील या कार्यक्रमासाठी एक सीन शूट केला होता. सीनमध्ये  ती आपल्या कुटुंबीयांशी म्हणजेच जेठालाल, मुलगा आणि गोकुळधामच्या इतर शेजार्‍यांशी फोनवर बोलत आहे आणि लवकरच ती गोकुळधाममध्ये परत येईल असे सर्वांना आश्वासन देत होती. पण आता तसे होताना दिसत नाही.

दिशा वाकानीने म्हणजेच दयाबेन शो सोडल्याच्या बातमीमुळे चाहत्यांना धक्का बसू शकता आणि आगामी काळात शोच्या टीआरपीवरही याचा परिणाम होऊ शकता. 'तारक मेहता का उल्टा चश्माह'  गेल्या 1 दशकापेक्षा अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. 

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मादिशा वाकानी