Join us  

'अग्गंबाई सूनबाई'मधील शुभ्राच्या खऱ्या आयुष्यातील पतीला पाहिलंत का?, जाणून घ्या त्याच्याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 7:00 AM

'अग्गंबाई सूनबाई' या मालिकेत शुभ्राची भूमिका अभिनेत्री उमा पेंढारकर हिने साकारली आहे.

छोट्या पडद्यावरील 'अग्गंबाई सूनबाई' मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले आहे. या मालिकेतील आसावरी, अभिजीत राजे, बबड्या, शुभ्रा, अनुराग या सर्व पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. या मालिकेत शुभ्राची भूमिका अभिनेत्री उमा पेंढारकर हिने साकारली आहे.   

अभिनेत्री उमा पेंढारकर हिचे पूर्ण नाव उमा ऋषिकेश पेंढारकर असे आहे. डोंबिवलीकर असलेल्या उमा पेंढारकर हिने तिचे महाविद्यालयीन शिक्षण हे रामनारायण रुईया महाविद्यालयात पूर्ण झाले. तिने सायकॉलॉजीमध्ये मास्टर्स केले आहे. त्यामुळे ती काउंसिलिंगचे कामही मोठया जबाबदारीने करते.

तसेच उमाने ज्योती शिधये यांच्याकडून कथ्थकचे धडे गिरविले आहेत. अद्वैत दादरकारचे आई-वडील शुभदा आणि श्रीकांत दादरकर यांच्याकडे तिने नाट्य संगीताचा डिप्लोमा केला. त्यात ती प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. प्रशांत दामलेंकडून उमाला हा पुरस्कार देण्यात आला होता. यावेळी तिला ‘संगीत संशय कल्लोळ’ हे पहिले-वहिले नाटक मिळाले. 

त्यानंतर तिने कलर्स मराठी वाहिनीवरील ‘स्वामिनी’ या मालिकेत पार्वतीबाई यांची भूमिका अगदी उत्तमरित्या साकारली.

उमाची ‘स्वामिनी’ ही पहिलीच मालिका होती.या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.

उमा पेंढारकरच्या नवऱ्याचे नाव ऋषिकेश पेंढारकर असून तो एक आर्टिटेक आहे . तसेच त्यांना देखील शास्त्रीय संगीताची आवड आहे.

टॅग्स :अग्गंबाई सूनबाईप्रशांत दामले