Join us  

छोट्या पडद्यावरील ही प्रसिद्ध अभिनेत्री दिसणार तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये दयाच्या भूमिकेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 2:22 PM

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत प्रेक्षकांना दया ही व्यक्तिरेखा पुन्हा पाहायला मिळणार असून दिशा नव्हे तर छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री ही भूमिका साकारणार असल्याची चर्चा रंगली आहे.

ठळक मुद्देतारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांची चांगलीच आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात.

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांची प्रचंड आवडती असून या मालिकेतील दया ही व्यक्तिरेखा तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. दया या भूमिकेत आपल्याला दिशा वाकानीला पाहायला मिळाले होते. पण गेल्या तीन वर्षांपासून ती या मालिकेचा भाग नाहीये. प्रेक्षक त्यांच्या लाडक्या दयाला मिस करत असून ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना मालिकेत पुन्हा कधी पाहायला मिळणार याची त्यांना उत्सुकता लागली आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत प्रेक्षकांना दया ही व्यक्तिरेखा पुन्हा पाहायला मिळणार असून दिशा नव्हे तर छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री ही भूमिका साकारणार असल्याची चर्चा रंगली आहे.

दिव्यांका त्रिपाठीला या मालिकेची ऑफर आली असल्याचे तिने झी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत नुकतेच सांगितले आहे. तिने या मुलाखतीत सांगितले आहे की, दया या भूमिकेसाठी मला विचारण्यात आले. पण सुरुवातीला मी यासाठी नकार दिला होता. पण सध्या मी या भूमिकेबद्दल विचार करत आहे. 

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांची चांगलीच आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. कोणत्याही कॉमेडी मालिकेने प्रेक्षकांचे इतके वर्षं मनोरंजन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या मालिकेतील जेठा, दया, माधवी भिडे, आत्माराम भिडे, रोशनसिंग सोठी, अय्यर, बबिता, कोमल, पोपटलाल या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत.

टॅग्स :दिशा वाकानीतारक मेहता का उल्‍टा चश्‍मादिव्यांका त्रिपाठी