Join us

परागने मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2016 13:15 IST

ब्रम्हराक्षस या मालिकेत राक्षसाची भूमिका कोण साकारणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली होती. या भूमिकेसाठी निकितिन धीर, राहुल देव आणि ...

ब्रम्हराक्षस या मालिकेत राक्षसाची भूमिका कोण साकारणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली होती. या भूमिकेसाठी निकितिन धीर, राहुल देव आणि चेतन हंसराज यांसारख्या छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्यांची नावे चर्चेत होती. पण या सगळ्यात अभिनेता पराग त्यागीने बाजी मारली. या मालिकेत राक्षसाची भूमिका ही सगळ्यात महत्त्वाची असल्याने या भूमिकेसाठी अनेक कलाकारांचे ऑडिशन्स आणि लूक टेस्ट घेण्यात आली होती. ऑडिशन आणि लूक टेस्टनंतर परागच या भूमिकेसाठी योग्य असल्याचे या मालिकेच्या टीममधील मंडळींना वाटले. परागने पवित्र रिश्ता या मालिकेत समजुतदार भावाची भूमिका साकारली होती. आतापर्यंत त्याने साकारलेल्या भूमिकांपेक्षा एक वेगळी भूमिका साकारायला मिळत असल्याचा खूप आनंद होत असल्याचे पराग सांगतो.