Join us

​थपकी प्यार की या मालिकेत रंगणार क्रिकेट मॅच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2017 16:22 IST

थपकी प्यार की या मालिकेत प्रेक्षकांना क्रिकेटची मॅच पाहायला मिळणार आहे. या मालिकेच्या कथानकाला सध्या खूप टर्न आणि ट्विस्ट ...

थपकी प्यार की या मालिकेत प्रेक्षकांना क्रिकेटची मॅच पाहायला मिळणार आहे. या मालिकेच्या कथानकाला सध्या खूप टर्न आणि ट्विस्ट देण्यात आले आहेत. पुढील काही भागांमध्ये बिहान आणि कबिर क्रिकेटचा सामना खेळण्यासाठी एकमेकांना आव्हान देणार आहेत. पण थपकी बिहानच्या नव्हे तर कबीरच्या टीमच्या बाजूने खेळणार आहे. मालिकेतील या भागाचे चित्रीकरण करणे हे टीमसाठी सोपे नव्हते. कारण टीममधील काही मंडळींना क्रिकेटच खेळता येत नव्हते. पण तरीही या भागाचे चित्रीकरण करताना या मालिकेच्या संपूर्ण टीमने खूपच मजामस्ती केली. या चित्रीकरणाच्यावेळी अनेकजण आपल्या बालपणाच्या आठवणीत रंगले होते. अनेक वर्षांनंतर क्रिकेट खेळल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. चित्रीकरण करत असताना ही मालिकेची टीम एखादे मोठे कुटुंब असल्याचेच वाटत होते. मालिकेचे चित्रीकरण करताना या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या जिग्या सिंगने खूप मजामस्ती केली. खरे तर क्रिकेट कसे खेळायचे हे जिग्याला माहीतच नव्हते. त्यामुळे या भागाचे चित्रीकरण करण्यासाठी ती खूपच नर्व्हस होती. पण यावेळी मनिष गोपलानी आणि सेहबान खान हे तिच्या मदतीला धावून आले. त्यांनी तिला क्रिकेट कसे खेळायचे हे शिकवले. क्रिकेट शिकायला मिळाल्यामुळे जिग्या सध्या खूप खूश आहे. ती सांगते, "थपकी या मालिकेने मला आतापर्यंत अनेक गोष्टी शिकवल्या आहेत आणि आता मला या मालिकेमुळे क्रिकेटचे धडे गिरवता आले. मी लहानपणापासून सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेत असे. पण मी कधीच कोणताच खेळ खेळले नव्हते. क्रिकेट हा आपल्या भारतातील प्रसिद्ध खेळ मला शिकवल्याबद्दल मी मनिष आणि सेहबानची आभारी आहे."