Join us  

Corona Pandemic: पौलोमी दासने केले प्रेक्षकांना विनंती, नका करू कोरोना व्हायरसची चेष्टा, सुरक्षीतता प्रथम पाळा 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 6:00 AM

कार्तिक पूर्णिमाच्या सेट वर हे पहिले अवघड होते, कारण आम्ही सर्वांना एक मेकांना मिठी मारून भेटायचो, पण आता आम्ही सर्व एकमेकांशी लांबून संपर्क करतो.

पौलोमी दासने कोरोना व्हायरसबद्दल तिच्या सोशल मीडियावर सर्वांना एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. व्हायरसच्या साथीने सर्वांनी सावध रहाण्याचे आवाहन केले आणि सर्वांनी हा रोग कसा टाळावा याबद्दल माहिती दिली आहे. म्हणूनच, पौलोमी  आणि तिच्या टीमने साथीच्या रोगापासून सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. केवळ सॅनिटायझरच नाही तर सर्वांना सेटवर मास्क घालने अनिवार्य केले आहे. 

 

पौलोमी दास आपल्या चाहत्यांना प्रवास करताना मास्क घालण्याचाही आवाहन केले आहे. आणि त्याबरोबरच फ्लूच्या प्रति सराव भावना व्यक्त केले आहे, पौलोमी म्हणाली, "जेव्हा आपण पहिल्यांदा कॉरोन बद्दल ऐकलं होता, तेव्हा सर्वांनी ह्याला मस्करीमध्ये घेते व त्याची चेष्टा केली, पण मला आता आस वाटतंय कि ह्या गोष्टीचा आता गंभीरता पूर्वक विचार करायला पाहिजे आणि  आवश्यक काळजी घ्यायला पाहिजे. जरीही आपण ह्या वायरसच्या जाळात नाही अडकलो आहे पण नियमित काळजी घेणे आवश्यक आहे. बाहेर पडल्यावर मास्क घालणे व सॅनिटायजरने हाथ साफ करणे हे आपल्या रोजच्या जीवन शैलीत स्वीकार करायला पाहिजे. कार्तिक पूर्णिमाच्या सेट वर हे पहिले अवघड होते, कारण आम्ही सर्वांना एक मेकांना मिठी मारून भेटायचो, पण आता आम्ही सर्व एकमेकांशी लांबून संपर्क करतो. सेटमध्ये प्रवेश करताना सुद्दा स्वतःला व आमच्या सामानाला स्वच्छ करतो. माजी सर्वांना विनंती आहे कि स्वतःची काळजी घ्या आणि अवती भवती स्वछता राखा". 

कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून बुधवारी या साथीला महारोगराई घोषित करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टड्रॉस गेब्रेयेसस यांनी जिनेव्हामध्ये म्हटलं आहे की, कोरोनाला आता जागतिक महामारी म्हटलं जाऊ शकतं. यासारखी महामारी कधी पाहण्यात आलेली नव्हती. आगामी दिवस आणि आठवड्यांमध्ये विषाणूबाधित रुग्ण आणि मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या