Join us  

Confirm!! 'चला हवा येऊ द्या' बंद झाल्यानंतर निलेश साबळेचा मोठा निर्णय; दिसणार नव्या चॅनेल्सच्या नव्या शोमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2024 10:00 AM

Nilesh Sable : निलेश साबळेसोबत भाऊ कदमदेखील या नव्या शोमधून प्रेक्षकांना हसवणार आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो 'चला हवा येऊ द्या'(Chala Hawa Yeu Dya)ने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर या शोला आणि त्यातील विनोदवीरांना खूप मिस करत होते. ते हा शो कधी सुरू होतोय, याची वाट पाहत होते. मात्र आता या शोचा मुख्य सूत्रधार डॉ. निलेश साबळे(Dr. Nilesh Sable)ने मोठा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. आता तो नव्या वाहिनीवरील नव्या शोमध्ये झळकणार आहे. होय, हे खरंय. तो कलर्स मराठी वाहिनीवरील हसताय ना ?हसायलाच पाहिजे!! या कार्यक्रमात दिसणार आहे. त्याच्यासोबत भाऊ कदम(Bhau Kadam)देखील पाहायला मिळणार आहे. 

महाराष्ट्राचा अत्यंत लाडका विनोदाचा बादशाह अर्थात डॉ. निलेश साबळे याच्याबरोबर विनोदाची ही सुपरफास्ट मेल आता कलर्स मराठी घेऊन येत आहे. डॉ. निलेश साबळेबरोबरच भाऊ कदम आणि ओंकार भोजने हे विनोदसम्राट या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. या शोचे नाव आहे हसताय ना ?हसायलाच पाहिजे!!. या कार्यक्रमाची  लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशी संपूर्ण धुरा डॉ. निलेश साबळे स्वतः सांभाळणार असून यात भाऊ कदम, ओंकार भोजनेबरोबरच सुपर्णा श्याम , स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण हे कलाकार त्यांना साथ देणार आहेत. तसेच या कार्यक्रमात महाराष्ट्राचे कॉमेडी किंग आणि अभिनेता भरत जाधव आणि चार दशकं सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या अलका कुबल आठल्ये हे दोन दिग्गज कलाकार दर भागामधे सेलिब्रिटी पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे विनोदाचा हा पॅावरबाज डोस घेण्यासाठी सज्ज रहा. 

''हसताय ना ? हसायलाच पाहिजे!!'

डॉ. निलेश साबळेने आपल्या बहारदार विनोदाने अवघ्या महाराष्ट्राला हसवले. केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभरात त्यांनी त्यांचे चाहते निर्माण केले. भाऊ कदमनेही आपल्या मिश्किल चेहऱ्याने आणि निखळ विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना आपलेसे केले. तसेच ओंकार भोजनेही आपल्या खास शैलीमुळे प्रेक्षकांचा लाडका झाला. आता विनोदाचे हे तीन हुकमी एक्के एकत्र येऊन पुन्हा एकदा नव्या जोशात , नव्या जल्लोषात विनोदाची चौफेर आतषबाजी करायला सज्ज झाले आहेत. प्रेक्षकांना खळखळून हसवायला येत असलेला ''हसताय ना ? हसायलाच पाहिजे!!' हा शो कलर्स मराठीवर २० एप्रिलपासून शनिवार - रविवार रात्री नऊ वाजता पाहायला मिळणार आहे. 

टॅग्स :चला हवा येऊ द्यानिलेश साबळेभाऊ कदम