Join us

Confirm : अर्चना पूरनसिंगने मारली बाजी; नवज्योतसिंग सिद्धूला केले रिप्लेस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 21:26 IST

कॉमेडियन कपिल शर्मा आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील ट्यूनिंग आणि मैत्री कधीच लपून राहिली नाही. जेव्हा सगळ्यांनीच कपिलला एकाकी पाडले ...

कॉमेडियन कपिल शर्मा आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील ट्यूनिंग आणि मैत्री कधीच लपून राहिली नाही. जेव्हा सगळ्यांनीच कपिलला एकाकी पाडले होते, तेव्हा सिद्धू यांनीच एका चांगल्या मित्राप्रमाणे त्याला धीर दिला. मात्र आता या दोघांमधील ट्यूनिंग आणि मैत्री काही दिवस बघावयास मिळणार नाही. होय, प्रकृती अस्वास्थ्यामुळे सिद्धू यांनी कपिलच्या शोमधून बाहेर पडण्याचे ठरविले आहे. दरम्यान, एका खात्रीशीर वृत्तानुसार, ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पंजाबचे पर्यटनमंत्री असलेल्या नवज्योतसिंग सिद्धू यांना अभिनेत्री अर्चना पूरनसिंग हिने रिप्लेस केले आहे. वृत्तानुसार नवज्योतसिंग सिद्धू आजारपणामुळे हा शो करणार नाहीत. ज्यामुळे कपिलच्या शोमध्ये सिद्धू यांच्याऐवजी आता अर्चना बघावयास मिळणार आहे. या वृत्तास अर्चना पूरनसिंग हिने स्वत:च दुजोरा दिला आहे. अर्चनाने आयएएनएसशी बोलताना हा खुलासा केला आहे. ‘कपिलच्या शोचे प्रेक्षक सिद्धूजी यांना या खुर्चीवर बघणे पसंत करतात. त्यामुळे सिद्धूजींच्या खुर्चीवर बसताना खूपच अवघड होणार आहे. जेव्हा कपिलने मला शूटिंगच्या दिवशी बोलाविले, तेव्हा मी माझ्या या जुन्या मित्राला नकार देऊ शकले नाही’, असे अर्चनाने स्पष्ट केले.’पुढे बोलताना अर्चनाने म्हटले की, ‘मी कपिलच्या शोमधील मोजक्याच एपिसोडमध्ये बघावयास मिळणार आहे. सिद्धूजी यांची प्रकृती सुधारताच पुन्हा तेच या शोमध्ये बघावयास मिळतील. ते पुन्हा एकदा त्यांच्या खुर्चीवर कब्जा करतील. कपिल आणि अर्चना यांच्यातील मैत्री खूप जुनी आहे. जेव्हा कपिल इतर कॉमेडियनप्रमाणे ‘कॉमेडी सर्कस’मध्ये परफॉर्मन्स करीत होता, तेव्हापासूनच अर्चना आणि त्याच्यात मैत्री झाली होती. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कपिल आणि सिद्धू यांच्यातील नाते चर्चेत आहे. असे म्हटले जात आहे की, नवज्योत कपिलवर नाराज आहेत. कारण त्यांना न विचारताच त्याने अर्चना पूरनसिंग हिला त्यांच्या जागेवर संधी दिली आहे. सिद्धू यांना कपिलचा असा काही राग आला आहे की, त्यांनी फोनवरच कपिलला खडसावले आहे. मात्र या बातमीत कितपत सत्यता आहे, हे सांगणे मुश्किल आहे.