चंदनने २०१५ साली नंदिनी खन्ना हिच्याबरोबर लग्न केले होते. या दाम्पत्याचे हे पहिलेच मूल असून, चंदन यामुळे चांगलाच खूश झाला आहे. त्यामुळेच त्याने पत्नीचेही आभार मानले आहेत. ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये चंदन प्रभाकर ‘चंदू चायवाले’ची भूमिका साकारताना बघावयास मिळत असे. मात्र आॅस्ट्रेलिया येथील व्हेकेशनदरम्यान कपिलसोबत झालेल्या मतभेदामुळे त्याने त्याच्या शोला बाय-बाय केले आहे. वास्तविक कपिल आणि चंदन बºयाचशा कालावधीपासून एकत्र काम करीत आहेत. त्यामुळेच त्यांच्यातील मैत्री सर्वश्रृत आहे. लाफ्टर चॅलेंजसारख्या प्रसिद्ध शोमध्ये या दोघांमधील जुंगलबंदी प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करीत असे. तेव्हापासून एकत्र काम करीत असलेल्या या मित्रांमध्ये गेल्या काही दिवसांपासून दरार निर्माण झाली आहे. आता त्यांच्यातील हा वाद किती काळ टिकणार हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.}}}} ">Me n my daughter....no words for this feelings. Love. pic.twitter.com/pSjbWOoBvh— Chandan Prabhakar (@haanjichandan) April 2, 2017
कॉमेडियन चंदन प्रभाकर बनला बाप; बेबीचा पहिलाच क्यूट फोटो केला शेअर!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2017 21:24 IST
‘द कपिल शर्मा शो’मध्ये चंदू चायवाल्याच्या भूमिकेत प्रेक्षकांना लोटपोट हसविणारा कॉमेडियन चंदन प्रभाकर वडील बनला आहे. ही गोड बातमी ...
कॉमेडियन चंदन प्रभाकर बनला बाप; बेबीचा पहिलाच क्यूट फोटो केला शेअर!!
‘द कपिल शर्मा शो’मध्ये चंदू चायवाल्याच्या भूमिकेत प्रेक्षकांना लोटपोट हसविणारा कॉमेडियन चंदन प्रभाकर वडील बनला आहे. ही गोड बातमी खुद्द चंदननेच त्याच्या फॅन्सबरोबर शेअर केली आहे. ट्विटवर आपल्या बेबीचा पहिल्याच क्यूट फोटो त्याने शेअर केला असून, त्यात न्यू बॉर्न बेबी खूपच गोड दिसत आहे. फोटो शेअर करताना चंदनने त्याखाली एक छानसा मॅसेजही लिहला आहे....चंदनची ही गोड बातमी त्याच्या फॅन्ससाठी नक्कीच सुखावणारी असून, गेल्या काही दिवसांपासून कपिल शर्मासोबत सुरू असलेल्या वादातून त्याला पूर्णत: दिलासा देणारी आहे. खरं तर असे म्हटले जाते की, आनंद आणि दु:ख एकमेकांसोबतच येत असतात. चंदनबाबतीत ही म्हण तंतोतंत खरी ठरताना दिसत आहे. कारण कपिलसोबतच्या मतभेदामुळे चंदन खूपच डिस्ट्रर्ब झाला होता. मात्र लगेचच त्याच्या आयुष्यात एका चिमुकल्या परीचे आगमन झाल्याने त्याच्या आयुष्यात पुन्हा आनंदी क्षण परतले आहेत.