Join us  

​बेलनवाली बहू या मालिकेतील क्रिस्टल डिसूझाने लहानपणी या कारणासाठी केली होती चिटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 12:32 PM

बेलनवाली बहूमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत क्रिस्टल डिसूझा दिसणार आहे. या मालिकेत ती रुपा अवस्थी या भूमिकेत दिसणार आहे तर लेखक ...

बेलनवाली बहूमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत क्रिस्टल डिसूझा दिसणार आहे. या मालिकेत ती रुपा अवस्थी या भूमिकेत दिसणार आहे तर लेखक व निर्माते, अभिनेते धीरज सरना तिच्या मृत पतीच्या भूताची म्हणजेच अमरनाथची भूमिका साकारणार आहेत. क्रिस्टल डिसूझा या बेलनवाली बहू या मालिकेत काम करत असल्याने तुझा आणि बेलनचा किती संबंध आहे याविषयी तिला विचारण्यात आले. त्यावर तिचा किचनचा खूपच कमी संबंध असल्याचे तिने कबूल केले आहे. जेवण बनवायला अनेकांना आवडते. पण क्रिस्टलला किचनमध्ये जायलाच लहानपणापासून आवडत नाही. तिला सगळ्यात पहिल्यांदा किचनमध्ये जाऊन काम करण्यासाठी तिच्या आईने ५०० रुपयांचे आमिष दिले होते. बेलनवाली बहू मालिकेची क्रिस्टल नायिका असली तरी चपात्या कशा बनवायच्या हेच तिला माहीत नाहीये. याविषयी क्रिस्टल सांगते, माझा आणि किचनचा कधीच संबंध येत नाही. मी जेवण बनवावे यासाठी एकदा माझ्या आईने चक्क पाचशे रुपयांचे मला आमिष दिले होते. चपाती कशाप्रकारे बनवतात हे शिकवण्याचा माझ्या आईने प्रयत्न केला. पण कधी मी श्रीलंकेचा तर कधी भारताचा तर कधी अमेरिकेचा नकाशा बनवला. काही केल्या चपातीला गोल आकार येतच नव्हताच. पण मी देखील काही केल्या माझी जिद्द सोडली नाही. माझी आई आजूबाजूला नाही आहे हे पाहून मी एक गोल भांडे घेतले आणि ते त्या चपातीवर उपडे टाकले. त्यामुळे माझ्या चपातीला सुंदर गोल आकार आला. पण मी चिटिंग केली असल्याचे माझ्या आईच्या लगेचच लक्षात आले. बेलनवाली बहू मध्ये वेंधळ्या पण प्रेमळ पत्नीची भूमिका क्रिस्टल डिसूझा साकारत आहे. आपल्या भूमिकेविषयी ती सांगते, “रुपा प्रणाणेच मी वास्तविक जीवनात आहे, बरेचजण मला अत्याधुनिक मुलगी समजतात जी नेहमी प्रत्येक गोष्टीसाठी अगदी सज्ज असते, पण माझी खरी विक्षिप्त बाजू त्यांना माहित नाही आणि त्यांची मला कधी पाहिलेले नाही. बेलनवाली बहू मध्ये मी विनोदी भूमिका साकारत आहे. Also Read : ​परेश गणंत्रा झळकणार बेलनवाली बहू या मालिकेत