चक्रव्यूह या मालिकेच्या सेटवर महिमा मकवाणाला झाला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2017 12:54 IST
चक्रव्यूह या मालिकेची सध्या चांगलीच चर्चा आहे. कारण या मालिकेत नारायणी शास्त्री, संगीता घोष, महिमा मकवाणा, प्रणित भट्ट यांसारखे ...
चक्रव्यूह या मालिकेच्या सेटवर महिमा मकवाणाला झाला अपघात
चक्रव्यूह या मालिकेची सध्या चांगलीच चर्चा आहे. कारण या मालिकेत नारायणी शास्त्री, संगीता घोष, महिमा मकवाणा, प्रणित भट्ट यांसारखे छोट्या पडद्यावरचे प्रसिद्ध कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. तसेच या मालिकेला बॉलिवूडचा सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा आवाज लाभणार आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकार आपल्या भूमिकेवर अतिशय मेहनत घेत आहे. या मालिकेत महिमा मकवाणा एक प्रमुख भूमिका साकारत आहे. या मालिकेतील तिचा लूकदेखील खूप वेगळा असणार आहे. ती या मालिकेत शिवभक्ताची भूमिका साकारणार असून तिच्या डोक्यावर जटासंभार असणार आहे. या भूमिकेसाठी सध्या ती केसांचा विग लावत आहे. मालिकेत ती बनारसमधील गंगेच्या काठी राहाणारी एक शिवभक्त दाखवली जाणार आहे. मालिकेच्या चित्रीकरणाच्या वेळी हा विग सतत तिच्या केसांवरच असतो. या विगसोबत सतत वावरणे हे तिच्याासठी खरे तर त्रासदायक आहे. पण तरीही भूमिकेची गरज म्हणून ती हे करत आहे. या विगमुळे नुकताच तिला भयानक अपघात झाला. चित्रीकरण सुरू असताना महिमा एका पंख्याच्या पुढे उभी होती. तिचा हा विग पंख्यात खेचला गेल्याने महिमाचे डोके भिंतीवर आटपून तिच्या डोक्याला दुखापत झाली. या घटनेत ती गंभीररित्या जखमी झाली. मालिकेच्या टीममधील सगळेच लगेचच धावून गेले आणि तिला तात्काळ मदत देण्यात आली. याविषयी महिमा सांगते, माझा केसांचा टोप फिरत्या पंख्यात अडकला. खरे तर तो अतिशय भयानक क्षण होता. आताही मला त्याविषयी आठवले तर भीती वाटते. मला काही कळायच्या आतच माझे डोके भिंतीवर जोरात आपटले गेले होते आणि मला मोठे टेंगूळ आले होते. पण सेटवरील सगळे लगेचच माझ्या मदतीला धावून आले. एखाद्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे त्यांनी माझी काळजी घेतली.Also Read : चक्रव्यूह या मालिकेतील संगीता घोष आणि महिमा मकवाणीच्या लूकची चर्चा