Join us

कॅँडलमार्चचा युरोप दिग्विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 05:03 IST

 इंटरनॅशनल मराठी फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'कॅंडल मार्च'ची खूप चर्चा झाली. इंडस्ट्रीतील लोकांनी या चित्रपटाचे खूप स्वागत केले. या प्रवासाबाबत सचिन ...

 इंटरनॅशनल मराठी फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'कॅंडल मार्च'ची खूप चर्चा झाली. इंडस्ट्रीतील लोकांनी या चित्रपटाचे खूप स्वागत केले. या प्रवासाबाबत सचिन देव म्हणतात, ''एके दिवशी मला निरोप आला की लवासामध्ये होणार्‍या सोहळ्यात तुमच्या चित्रपटाचे नॉमीनेशन झाले आहे. त्यानंतर इंटरनॅशनल मराठी फिल्म फेस्टिव्हलमध्ये चित्रपय गेला. बेस्ट डायरेक्टरचे अवॉर्ड हा माझ्यासाठी अत्यंत सुखद धक्का होता.'कॅडल मार्च'ला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद हा खरोखरीच उत्साह वाढविणारा होता. 'माहेरची साडी'सारख्या चित्रपटावेळी महिला रडायच्या हे फक्त ऐकले होते. 'कॅँडल मार्च'च्या वेळी तो अनुभव प्रत्यक्ष घेतला. अनेक महिला रडतच चित्रपट पाहत होत्या. 'बर्फी'ने दिला संपूर्णतेचा अनुभववडील मधुकर देव निर्माते असल्याने कलाक्षेत्राशी पहिल्यापासूनच संपर्क होता. बालकलाकार म्हणून नाटकांमध्ये काम करत होतो. कॉलेज जीवनातील एकांकिका करत होतो. नंतर असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करण्यास सुरूवात केली. अनेक वर्षे हिंदी सिरीयल्स केल्या. पण सगळ्यात महत्वाचा अनुभव मिळाला दिग्दर्शक अनुराग बसू यांच्यासोबत. 'बर्फी'चित्रपटासाठी मी त्यांना असिस्ट केला. कोणताही कलाकार हा आयुष्यभर शिकतच असतो. परंतु, 'बर्फी'च्या मेकींगने मला एक पूर्णत्वाचा अनुभव दिला. प्रेक्षकांचा प्रतिसाद हेच समाधान'कॅडल मार्च'ला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद हा खरोखरीच उत्साह वाढविणारा होता. 'माहेरची साडी'सारख्या चित्रपटावेळी महिला रडायच्या हे फक्त ऐकले होते. 'कॅँडल मार्च'च्या वेळी तो अनुभव प्रत्यक्ष घेतला. अनेक महिला रडतच चित्रपट पाहत होत्या. महिलांवरील अत्याचार हा एक प्रश्न आहेच पण त्यानंतरची समाजाची मानसिकता ही महत्वाची आहे. अत्याचार सहन करताना गळचेपी कुठे, कशी होते, त्यातून बाहेर पडण्यासाठी कोणत्या बाबी बदलायला हव्यात, ज्या सहज बदलता येण्याजोग्या आहेत, ही उत्तरेही 'कॅँडल मार्च'मधून शोधण्याचा प्रयत्न केला आहे. स्क्रिप्टवर काम केल्याने प्रत्येक वेगवेगळी कथा अलगदपणे जोडता आली आहे. तेजस्विनीपंडित, स्मिता तांबे, मनवा नाईक, सायली सहस्रबुद्धे, आशिष पठाडे, नीलेश दिवेकर यांनी दमदार अभिनय करत महिलांच्या समस्यांमागील विचार मांडले आहेत. प्रत्यक्षातील घटना पडद्यावर मांडणे तसे अवघडच. बलात्कार किंवा लैंगिक शोषणासारख्या घटना असतील तर ते आणखीनच अवघड होते. परंतु, दिग्दर्शक सचिन देव यांनी हे शिवधनुष्य पेलले आणितरुणाईच्या मनातील भावना 'कॅँडल मार्च'मधून पडद्यावर मांडल्या. युरोपमध्ये रंगलेल्या इंटरनॅशनल मराठी फिल्म फेस्टीव्हलमध्ये या चित्रपटासाठी सचिन देव यांना सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. यानिमित्ताने सचिन देव यांच्याशी केलेली बातचित..'कॅँडल मार्च'च्या प्रवासाबाबत सचिन म्हणतात, दिल्लीतील निर्भया प्रकरण किंवा शक्ती मिल प्रकरणानंतर हा विषय खूप चर्चेत आला होता. दररोजचे दैनिक उघडले तरी किमान दोन- तीन बलात्काराच्या बातम्या दिसतात. त्यामुळेच हा विषय अपीलींग वाटला. लेखक सचिन दरेकर यांच्याकडे एक कथा होती. मात्र, मला वाटले की ती वेगळ्या पध्दतीने मांडायला हवी. त्यासाठी वेगळ्या पध्दतीची स्क्रिप्ट केली.चार ट्रॅक पॅरलली पुढे जातात आणि शेवटी एकमेंकांमध्ये मिसळून जातात, अशा पध्दतीेने आम्ही हा विषय मांडायचे ठरविले. जवळपास वर्षभर हे सगळे चालू होते. पेपरवर्क अगदी चपखलपणे बसविणे गरजेचे होते. प्रत्येक ट्रॅक आमच्या मनात तयार होता. चित्रपटाची प्रत्येक फ्रेम मनात होती.विषयाची पूर्णपणे मांडली झाल्यावर आम्ही निर्मात्याचाशोधसुरू केला. प्रत्येकालाच तो आवडला. परंतु, अनेकांना हा विषय जड वाटला. काहींना तर मराठीसाठी तो जास्तच बोल्ड वाटला. काहींना त्यामध्ये कमश्रीयल व्हॅल्यू दिसेना. मात्र, अंजली आणि निलेश गावडे यांना हा विषय खूप भावला. त्याप्रमाणे शुटींग सुरू झाले. चित्रपटातील कास्टिंग अत्यंत महत्वाचे होते. एक मॅच्यूर, तावून सुलाखून निघालेली आपली सगळी घुसमट आतल्या आत दाबून टाकणारी कलाकार हवी होती. त्यासाठी तेजस्विनी पंडीतचे नाव पुढे आले. तेजस्विनी सिंधुताई सपकाळपासून अनेक चित्रपटात आपली क्षमता सिध्द केली होती. 'कॅँडलमार्च'मध्येही तिचा अभिनय अप्रतिम झाला आहे. दुसरे कॅरेक्टर स्मिता तांबे हिचे हाोते. हे तसे खूप लाऊड कॅरेक्टर होते. मधली थिनलाईन महत्वाची होती. ती थोडीशी जरी पार झाली असती तरी कदाचित ते व्हल्गर वाटले असते. मात्र, स्मिताने ही कसरत छान सांभाळली. स्मिताच्या नवर्‍याची भूमिका निलेश दिवेकरने साकारली आहे. सगळ्याच कलाकारांनी खूप मेहनत घेतली. त्यामुळे चित्रपटाचा अपेक्षित असा परिणाम साधला गेला. हा सगळा प्रवास हा खूप खडतर होता. मात्र, त्यातून मिळालेले समाधानही फार मोठे होते.