खाण्यावरून जमली गट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2016 15:45 IST
नामकरण ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेचे चित्रीकरण सध्या जोरात सुरू आहे. या मालिकेत बरखा बिष्ट ...
खाण्यावरून जमली गट्टी
नामकरण ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेचे चित्रीकरण सध्या जोरात सुरू आहे. या मालिकेत बरखा बिष्ट आणि विराफ फिरोज पटेल प्रमुख भूमिका साकारत आहेत. सध्या या दोघांची खाण्यावरून चांगलीच गट्टी जमली आहे. बरखा ही खूप फूडी आहे आणि त्यातही तिला पारसी पदार्थ खूप आवडतात. त्यामुळे विराफने त्याच्या घरून एक पारसी पदार्थ बनवून बरखासाठी आणला होता. याविषयी विराफ सांगतो, "माझे आणि बरखाचे एकत्र चित्रीकरण खूपच कमी असते. त्यामुळे बरखासाठी खायला आणणे मला जमत नव्हते. बरखासोबत माझे चित्रीकरण असणार आहे हे मला कळल्यावर मी तिला एक सरप्राईज द्यायचे ठरवले. धसनाक हा पारसी पदार्थ मी खास तिच्यासाठी घेऊन गेलो होतो. हा पदार्थ खाल्ल्यानंतर बरखा खूपच खूश झाली होती."