Join us  

अभिनयाऐवजी बिहारमध्ये शेती करण्याची का वेळ आली छोट्या पडद्यावरील या अभिनेत्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2019 12:40 PM

मालिका व चित्रपटात झळकलेला हा अभिनेता सध्या बिहारमध्ये शेती करतो आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका साराभाई व्हर्सेस साराभाईमधील मम्माज बॉय रोशेस आठवत असेल ना. रोशेस उर्फ राजेश कुमार सध्या बिहारमध्ये शेती करतो आहे. इतकेच नाही तर त्याच्यासोबत तिथला अभिनेता क्रांती प्रकाश झादेखील शेती करतो आहे. हे दोघे बिहारमधील गया जिल्ह्यात शेती करत आहेत. दोघांचे शेती करण्यामागे हा उद्देश आहे की शहरांकडे वळलेल्या युवांना पुन्हा गावात आणून शेती करण्यासाठी त्यांना प्रोत्साहीत करणे.स्वप्ननगरी मुंबईत वास्तव्यास येऊन यशस्वी झाल्यानंतर पुन्हा आपल्या मुळ गावी परतणं कठीण होते. पण राजेश व क्रांती यांनी अभिनय व शेती दोन्ही करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन तरूण वर्गदेखील त्यांच्या गावी परततील. सोशल मीडियावर राजेशने व्हिडिओ व फोटो शेअर केले आहेत.

क्रांती झा बिहारमधील लोकप्रिय झठी मैया व्हिडिओमधील आधुनिक युवक म्हणून खूप लोकप्रिय झाला होता. बॉलिवूडबद्दल सांगायचं तर एमएस धोनी चित्रपटात त्याने धोनीच्या मित्राची भूमिका केली होती.

राजेशबद्दल सांगायचं तर राजेश साराभाई व्हर्सेस साराभाई मालिकेत मम्माज बॉय म्हणून घराघरात पोहचला होता. याशिवाय छोट्या पडद्यावरील मालिका एक महल हो सपनों का, बा बहू और बेबी, भूत वाला सीरियल व कुसूम या मालिकेत काम केले आहे.

याशिवाय या वर्षी प्रदर्शित झालेला चित्रपट स्टुडंट ऑफ द ईयर २मध्ये देखील तो झळकला होता.