Join us

बिग बॉस : स्वामी ओमने ओलांडल्या सर्व मर्यादा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2016 18:56 IST

प्रियंका जग्गा हिच्या हकालपट्टीनंतर काहीसे शांत झालेल्या बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा घमासान बघावयास मिळत आहे. कॅप्टनसीवरून देण्यात आलेल्या ...

प्रियंका जग्गा हिच्या हकालपट्टीनंतर काहीसे शांत झालेल्या बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा घमासान बघावयास मिळत आहे. कॅप्टनसीवरून देण्यात आलेल्या ‘काश्मिरी वादळ’ या टास्कमध्ये बिग बॉसच्या इतिहासातील सर्वाधिक वादग्रस्त कटेंस्ट ठरलेल्या स्वामी ओमने सर्वच मर्यादांचे उल्लंघन करून असा काही कारनामा केला की, ज्यामुळे घरातील सर्व मुलींची मान शरमेने खाली गेली. या टास्कच्या सुरुवातीपासूनच घरातील सदस्यांमध्ये तू तू मै मै बघावयास मिळाली, सुरुवातीला गौरव चोपडा आणि स्वामी ओम यांच्यात गरमागरमी झाली. त्यानंतर लोपामुद्रा आणि बानी जे यांच्यात शाब्दिक चमकम झाली. अर्थात हा वाद टास्कमधून बाहेर पडण्यावरून होत होता. जेव्हा स्वामी ओम या टास्कमधून बाहेर पडले तेव्हा त्यांनी घरातील सदस्यांना असा काही त्रास दिला ज्यामुळे ते सलमानच्या विकेण्ड का वॉर या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा खलनायकाच्या खुर्चीवर बसण्यास पात्र ठरणार आहेत. }}}} ">http://यावेळी स्वामी ओम यांनी चक्क घरातील महिला सदस्यांसमोर आपली पॅण्ट काढत घरातील नियमाचे उल्लंघन केले आहे. स्वामी ओमने केलेला हा प्रताप घरातील महिला सदस्यांसाठी संतापजनक होता. लोपामुद्रा हिने तर स्वामी ओमला तेव्हाच सुनावत तू घरात राहण्याच्या लायकीचा नसल्याचे म्हटले. विशेष म्हणजे नेहमीच स्वामी ओमच्या बाजूने उभा राहणाºया मनवीरनेदेखील स्वामी ओमला सुनावले. टास्कमधून बाहेर पडल्यानंतर तुझा इतरांना त्रास देण्याचा काही एक अधिकार नाही, अशा शब्दात मनवीरने स्वामी ओमची खरडपट्टी काढली. }}}} ">http://त्याचे झाले असे की, टास्कमधून अगोदरच बाहेर पडलेल्या स्वामी ओम यांनी रोहनसोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. इग्लूसमोर एका स्टूलवर बसलेल्या स्वामी ओमने बाजूला जाण्यास नकार दिला. त्यावरून रोहन आणि त्यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली. हा वाद ऐवढा वाढला की, स्वामी ओमने पॅण्ट उतरवित आपल्यातील खलनायकवृत्तीचे दर्शन दिले. स्वामी ओमचा हा संपूर्ण प्रकार बेडरूममध्ये बसून, लोपा, बानी, नीतिभा आणि मोनालिसा बघत होत्या. त्यांनी केलेला हा सर्व प्रकार लज्जास्पद असल्याने सर्वच मुलींनी त्यांना खडेबोल सुनावले. त्यामुळे स्वामी ओमची बोलती बंद झाली होती. वास्तविक स्वामी ओम घरातील सर्वच महिला सदस्यांना मुलीचा दर्जा देतात; मात्र बºयाचदा त्यांच्या पर्सनल आयुष्यावर बोलण्यास कधीच मागे राहत नाहीत. त्यामुळे स्वामी ओमचा हा प्रताप घरातील महिला सदस्यांना नक्कीच धक्कादायक ठरला आहे. आता बिग बॉस स्वामी ओमवर काय कारवाई करणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.