Join us  

'हमारी अधुरी कहानी'नंतर बिग बॉस फेम सारा खान झळकणार या सिनेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2023 6:07 PM

'विदाई' या मालिकेतून सारा खान हे नाव घराघरात पोहोचलं. बिग बॉस सारख्या वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शोचा देखील ती भाग होती.

'विदाई' या मालिकेतून सारा खान हे नाव घराघरात पोहोचलं. बिग बॉस सारख्या वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शोचा देखील ती भाग होती. काही महिन्यापूर्वी सारा कंगना राणौवतच्या लॉकअप शोमध्ये दिसली होती. लवकरच तिचा  'द एरा ऑफ 1990' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. 

या चित्रपटाचे दिग्दर्शन शाहिद काझमी यांनी केले आहे. 'द एरा ऑफ 1990' हा पूर्णपणे कमर्शियल  चित्रपट आहे. परंतु तो 1990 च्या दशकातील जगभरातील 'बॉलीवूड चित्रपट पायरसी' घोटाळ्यांच्या अतिशय महत्वाच्या विषयावर आधारित आहे. 

 शाहिद काजमी म्हणतात, मला विश्वास आहे की प्रेक्षकांना हा चित्रपट नक्की आवडेल आणि पायरसी घोटाळ्याबद्दल ते जाणून घेतील, दिग्दर्शक शाहिद काझमी यांनी चित्रपटाचे सर्व कलाकार आणि क्रू मेंबर्स चे आभार मानले. तसेच हा चित्रपट, चित्रपटगृहात जाऊन पाहण्याचे आवाहन केले. दिग्दर्शक शाहिद काझमी यांच्या म्हणण्यानुसार, "बॉलिवूड इंडस्ट्रीला ऑनलाइन पायरसीचा मोठा फटका बसला आहे, ऑनलाइन संगीत आणि चित्रपट पायरसीमुळे होणारे वार्षिक नुकसान चिंताजनक आहे. मला प्रेक्षकांना दाखवायचे होते की ऑनलाइन पायरसी किती व्यापक आहे, त्याचा व्यवसायावर कसा परिणाम होतो. 

साराचा 'द एरा ऑफ 1990' हा चित्रपट 3 मार्च 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. सारा खान ही प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिनं २००७ साली मिस भोपाळ हा किताब जिंकला होता. स्टार प्लसवरील 'सपना बाबूल का...'बिदाई' या मालिकेत तिनं साधनाची भूमिका साकारली असून ती लोकांच्या खूप पसंतीच पडली होती. 'बिदाई' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली साराला आजही साधना म्हणूनच चाहते ओळखतात. 

टॅग्स :सारा खान