Join us  

राखी सावंतचा ‘नागीन’ अवतार...! व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 1:06 PM

‘बिग बॉस 14’ शो संपला आहे पण राखीच्या करामती संपलेल्या नाहीत. सध्या तिचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.

ठळक मुद्देसलमान खान व सोहेल खान यांच्यामुळेच राखीला ‘बिग बॉस 14’मध्ये जाण्याची संधी मिळाली होती. ईटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत राखीने स्वत: याबद्दल सांगितले होते.

‘बिग बॉस 14’ मध्ये राखी सर्वात एंटरटेनिंग कंटेस्टंट होती. एक चॅलेंजर म्हणून तिने घरात एन्ट्री घेतली होती. बिग बॉसच्या फिनालेपर्यंत जाणारी ती एकमेव चॅलेंजर ठरली. टॉप 5 मध्ये जागा पक्की केल्यानंतर 14 लाख रुपये घेऊन राखीने शो सोडला होता. ‘बिग बॉस 14’च्या घरातील राखीच्या एका एका करामतीने प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. आता शो संपला आहे पण राखीच्या करामती संपलेल्या नाहीत. सध्या तिचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. तो पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणार नाही.

होय, तिचा हा मजेदार व्हिडीओद्वारे प्रेक्षकांना पोट धरून हसण्यास भाग पाडत आहे. तर यावेळी राखीला चक्क नागीण बनण्याची इच्छा झाली. मग काय, तिने दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीच्या ‘नगीना’ या चित्रपटाच्या गाण्यात त्यांच्या जागी स्वत:चा चेहरा मॉर्फ केला आहे. राखीचा हा व्हिडीओ पाहून तिच्या चाहत्यांना हसू आवरत नाहीय.

‘मला श्रीदेवीजी खूप आवडतात. माझा आवडता चित्रपट ‘नागीन’ आहे. जर हा चित्रपट पुन्हा तयार करायचा झाला, तर मग कोणाला कास्ट करावे? आपली निवड कमेंटमध्ये शेअर करा,’असे हा व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिले आहे. (  राखी सावंतने आपल्या या पोस्टमध्ये श्रीदेवीच्या सिनेमाचे नाव ‘नागीन’ असे लिहिले आहे. आता ते ‘नागीन’ नाही तर ‘नगीना’ आहे, हे मात्र ज्याचे त्याने समजून घ्यावे.) राखीने अलीकडे एका मुलाखती दरम्यान एका मोठा खुलासा केला होता.  प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांना माझ्या आयुष्यावर चित्रपट बनवायचा होता, असे तिने सांगितले होते. 

सलमान खान व सोहेल खान यांच्यामुळेच राखीला ‘बिग बॉस 14’मध्ये जाण्याची संधी मिळाली होती. ईटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत राखीने स्वत: याबद्दल सांगितले होते. सोहेल भाईने माझी खूप मदत केली. मी त्यांना मॅसेज केला होता. मला इंडस्ट्रीत काम करायचे आहे. मला ‘बिग बॉस’मध्ये जायचे आहे. काम मागण्यात मला काहीही लाज वाटत नाही, असे मी त्यांना म्हणाले होते. कदाचित सोहेलभाईने सलमान भाईपर्यंत माझा मॅसेज पोहोचवला असावा, असे राखी म्हणाली होती.

टॅग्स :राखी सावंत