Join us  

Bigg Boss 12: हे आहेत बिग बॉसच्या घरातील अंतिम बारा स्पर्धक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 5:51 PM

हिंदी रिएलिटी शो 'बिग बॉस १२'च्या चाहत्यांची अखेर प्रतीक्षा संपली आहे. या शोची सुरूवात नुकतीच झाली असून पुन्हा एकदा दबंग खान सलमानचा मजेशीर अंदाज या शोमध्ये पाहायला मिळाला.

ठळक मुद्देबिग बॉसच्या घरातील अंतिम बारा स्पर्धक

हिंदी रिएलिटी शो 'बिग बॉस १२'च्या चाहत्यांची अखेर प्रतीक्षा संपली आहे. या शोची सुरूवात नुकतीच झाली असून पुन्हा एकदा दबंग खान सलमानचा मजेशीर अंदाज या शोमध्ये पाहायला मिळाला. सलमानने या शोच्या मंचावर स्पर्धकांचे स्वागत केले. हे आहेत बिग बॉसच्या घरातील बारा स्पर्धक.

दीपिका कक्कर

 दीपिका मुळची पुण्याची असून तिने 'नीर भरे तेरे नैना' या मालिकेत लक्ष्मीच्या भूमिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. 'ससुराल सिमर का' मालिकेतील तिची सीमाची भूमिका खूप गाजली. तिने तिचा सहकलाकार शोएब इब्राहिमसोबत विवाह केला. नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट 'पलटन'मधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

 

नेहा पेंडसे

नेहा पेंडसेने मराठी, तमीळ, तेलगू, मल्याळम व हिंदी चित्रपटात काम केलेले आहे. त्याशिवाय ती लोकप्रिय मालिका व जाहिरातीमध्ये झळकली आहे. 'भाग्यलक्ष्मी' या तिच्या मराठी मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. विशेष बाब म्हणजे नेहाने ९०च्या दशकात बालकलाकार म्हणून काम केले आहे.

सृष्टी रोडे

सृष्टी रोडेने बऱ्याच हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. तिने 'ये इश्क हाय' या मालिकेतून छोट्या पडद्यावर एन्ट्री केली होती. तसेच 'शोभा सोमनाथ की' मालिकेतील तिने साकारलेली राजकुमार शोभाची भूमिका खूप गाजली होती. 

करणवीर बोहरा

करणवीरचे खरे नाव मनोज बोहरा आहे. ज्याने आपले नाव बदलून करणवीर बोहरा असे केले आहे. करणवीरने शरारत मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 'कसौटी जिंदगी की', 'दिल से दुआ सौभाग्यवती भव:', 'नागिन २' व 'कबूल है' या मालिकेत काम केलेले आहे. याशिवाय त्याने सात चित्रपटांमध्ये कामही केले आहे.

श्रीसंत 

श्रीसंत भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू होता. आईपीएल 2013 स्पॉट फिक्सिंग प्रकरणात त्याचाही समावेश होता. 'खतरों के खिलाड़ी सीजन 9' मध्ये तो सहभागी झाला होता.

अनुप जलोटा 

अनुप जलोटा हे भजन सम्राट म्हणून प्रचलित आहेत. ते गझल गायकदेखील आहेत. ते नेहमी वादविवादापासून दूर असतात. पण, २०१५ साली त्यांची पत्नी रीना गोलन यांनी आपल्या पुस्तकात त्यांच्यावर काही आरोप केले होते. मात्र त्यांनी आरोप चुकीचे असल्याचे सांगितले होते.

जसलीन मथारू

जसलीन ही युवा गायिका असून तिने वयाच्या अकराव्या वर्षी शास्त्रीय व पाश्चिमात्य गायनाचे धडे गिरवण्यास सुरूवात केली. तिने मिका सिंगसोबत परफॉर्मन्स केले आहेत.

शिवाशीष मिश्रा व सौरभ पटेल 

शिवाशीष मिश्रा व सौरभ पटेल मध्यप्रदेशमध्ये राहणार आहेत. शिवाशीष शेतकरी आहे तर सौरभ बिझनेसमॅन आहे.

सोमी खान व सबा खान 

सोमी खान व सबा खान या दोघी जयपूरला राहणाऱ्या बहिणी आहेत. बिग बॉसच्या घरातील इतर स्पर्धकांशी स्पर्धा करण्यासाठी यांचे नाते कामी येणार आहे. 

रोमिल चौधरी आणि निर्मल सिंह

रोमिल चौधरी व निर्मल सिंग हरियाणामध्ये राहणारे आहेत. रोमिल वकील आहे तर निर्मल पोलीस आहे. 

दीपक ठाकुर व उर्वशी वानी 

दीपक ठाकूर 'गँग्स ऑफ वासेपुर' चित्रपटाचे गायक आहेत. त्यांच्यासोबत त्यांची चाहती उर्वशी वानीदेखील बिग बॉसच्या घरात सहभागी झाली आहे. 

 

टॅग्स :बिग बॉस 12सलमान खान