Join us  

Bigg Boss 12 : अनुप जलोटांची कमाई ऐकून तुम्हीही म्हणाल, गोविंद बोलो हरी गोपाल बोलो!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2018 5:02 PM

भजन क्षेत्रात इतक्या वर्षात अनुप जलोटा यांनी रसिकांचे प्रेम संपादन केले आहे. त्यांची तिच लोकप्रियता इनकॅश करण्याचा बिग बॉस शोच्या निर्मात्यांचा प्रयत्न असावा. म्हणूनच थेट गर्लफ्रेंडबरोबरच अनुप जलोटा यांची या घरात एंट्री केली गेली.

रसिकांच्या प्रेमामुळेच सेलिब्रिटी मंडळी त्यांच्या करिअरमध्ये कोट्यवधींची कमाई करतात. दर महिन्याला सेलिब्रिटी गलेलठ्ठ कमाई करतात. करिअरच्या सर्वोच्च शिखरावर असताना होणा-या कमाईचा आकडा पाहून अनेकांना धक्काही बसतो.याच यादीत आता अनुप जलोटा यांचेही नाव गणले जात आहे. मुळात अनुप जलोटा हे भजनसम्राट म्हणून ओळखले जातात. सध्या अनुप जलोटा 'बिग बॉस12' शोमध्ये सहभागी झाल्यामुळे खूप चर्चेत असतात. दुसरे कारण म्हणजे जस्लिन मथारू या 28 वर्षीय गर्लफ्रेंडमुळेही अनुप जलोटा सर्वांचे लक्ष वेधुन घेत आहेत.  मुळात बिग बॉस या मध्ये सहभागी होण्याची प्रत्येकाची इच्छा असते. या शोमुळे अनेकांची  नशीब पाटलते. मात्र जेव्हा अनुप जलोटा या सगळ्यात जास्त वादग्रस्त शोमध्ये सहभागी होणार हे कळताच सा-यांनाच आश्चर्याचा धक्काच बसला. याहूनही धक्कादायक गोष्ट म्हणजे  गर्लफ्रेंड जसलीन मथारूसह ते रिलेशिपमध्ये आहेत हे जाणून तर भल्याभल्यांना विश्वास बसला नाही.या शोमुळेच आजपर्यंत माहिती नसलेली ही गोष्ट सा-यांनाच समजली.

तसेच या शोसाठी त्यांना तगडी रक्कम ऑफर करण्यात आली आणि अपना सपना मनी मनी म्हणत त्यांनी ही ऑफर स्विकारली अनुप जलोटा यांना बिग बॉस शोसाठी दर आठवड्याला 40 लाख रूपये मिळत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार भारतात भजनाचे कार्यक्रम करण्यासाठी 1 तासासाठी 8 ते 10 लाख रूपये घेतात. तर परदेशात कार्यक्रम सादर करण्यासाठी 15 ते 16 लाख रूपये घेतात.त्यानुसार पदेशात होणा-या कार्यक्रमातून 60 लाख रूपयांची कमाई अनुप जलोटा करतात.या व्यतिरिक्तही अनुप जलोटा दर महिन्याला तब्बल दोन कोटींची कमाई करतात. जवळपास महिन्याभरात ते 12 ते 15 कार्यक्रम करतात. त्यानुसार महिन्याची कमाई 1 कोटींच्या घरात आहे.

भजन क्षेत्रात इतक्या वर्षात अनुप जलोटा यांनी रसिकांचे प्रेम संपादन केले आहे. त्यांची तिच लोकप्रियता इनकॅश करण्याचा बिग बॉस शोच्या निर्मात्यांचा प्रयत्न असावा. म्हणूनच थेट गर्लफ्रेंडबरोबरच अनुप जलोटा यांची या घरात एंट्री केली गेली. त्यांच्या अनोख्या प्रेमकहानीमुळेच आजपर्यंत मिळाली नाही इतकी लोकप्रियता त्यांना बिग बॉस या शोमुळे मिळत आहेत. 

टॅग्स :बिग बॉस 12अनुप जलोटाजसलीन मथारू