Join us  

'शिवा' मालिकेत मोठा ट्विस्ट, आशूच्या पार्टीमध्ये शिवाचं नवं रूप येणार समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 3:46 PM

Shiva Serial : 'शिवा' मालिकेच्या येत्या आठवड्यात अनेक घडामोडी घडणार आहेत.

'शिवा' (Shiva Serial) मालिकेच्या येत्या आठवड्यात अनेक घडामोडी घडणार आहेत. आपण पाहिले की आशु दिव्याच्या प्रेमात आहे हे सत्य पाना गँगला कळतं आणि पाना गँगमध्ये दोन गट पडतात, अप्पर डिप्पर आणि सायलेंसर व स्टेपणी. अप्पर डिप्परला असे वाटते की शिवाला सगळे सत्य कळले पाहिजे. तर सायलेंसर व स्टेपणीला शिवापर्यंत ह्या गोष्टी पोहोचू नये असे वाटते. आपणच आशु आणि शिवाच जुळवून देऊ म्हणजे त्यांचंच लग्न होईल. 

तर दुसरीकडे आशु शिवा आणि दिव्याला पार्टीसाठी आमंत्रित करतो. आशु आमंत्रणाबरोबर शिवाला पार्टीसाठी नवीन कपडे देतो. शिवा पार्टीमध्ये आशुने दिलेले कपडे घालून येते. पार्टीमध्ये शिवाचंच सगळे कौतुक करतात, आशुचे मित्र असं समजतात की शिवा आणि आशूचं लग्न ठरलय. पार्टीत आशु शिवाची खास काळजी घेतो. शिवाला काटा चमच्याने खाता येत नाही म्हणून आशु देखील हाताने खातो आणि तिला कम्फर्टेबल करायचा पूर्ण प्रयत्न करतो. 

शिवा पार्टीमध्ये असताना  वस्तीतील लोक शिवाच्या गॅरेजवर जातात आणि तिने सांगितल्याप्रमाणे आम्ही त्या पेपर्सवर सह्या केल्याचं सांगतात. त्यामुळे आमचे घरदार जाणार आणि त्यांच्या जागेवर कब्जा होणारे हे कळते. वस्तीतले लोक खूप टेन्शनमध्ये आहेत. ते गँगला सांगतात की शिवा ह्या प्रोजेक्टच्या मालकासोबत म्हणजे आशुसोबत फिरत आहे. शिवाला वस्तीतल्या लोकांचे सत्य कळते आणि तिला धक्का बसतो. आशु असे काहीतरी करू शकेल यावर तिचा विश्वास बसत नाही.  आता शिवा, आशुला या प्रोजेक्टच्या मागचं सत्य विचारले? आशुने शिवा बरोबर केलेली मैत्री त्याच्या स्वार्थासाठी होती का? हे सगळे तुम्हाला या आठवड्यात पाहायला मिळेल.