Join us  

नवीन अनीता भाभी बनली नेहा पेंडसे, 'भाबीजी घर पर है'मध्ये सौम्या टंडनला केलं रिप्लेस

By गीतांजली | Published: January 05, 2021 12:21 PM

गेल्या वर्षी सौम्या टंडनने शोला निरोप दिला होता.

टीव्ही मालिका 'भाबीजी घर पर है' मध्ये नवीन 'अनिता भाभी' सापडली आहे. गेल्या वर्षी सौम्या टंडनने शोला निरोप दिला होता. तेव्हापासून चाहते 'अनिता भाभी'ची प्रतीक्षा करत आहेत. अनेक महिन्यानंतर निर्मात्यांनी सौम्या टंडनच्या जागी मराठमोळी नेहा पेंडसेचे नाव कन्फर्म केलं. सौम्याने ऑगस्ट महिन्यात शोला निरोप दिला. तेव्हापासून 'अनिता भाभी' स्क्रीनवर दिसत नव्हती.

ईटाइम्सच्या रिपोर्टनुसार, सौम्या टंडन म्हणाली होती की नोकरी करणे आणि नियमित पैसे कमवणे हे माझ्यासाठी एक्सायटिंग नव्हते.  सौम्या म्हणाली की 'भाबी जी घर पर है' या मालिकेने तिच्या ग्रोथमध्ये खूप योगदान दिले आहे. हा प्रवास तिच्यासाठी अविस्मरणीय राहिला, परंतु आता येत्या पाच वर्षांत तिला स्वतःला त्याच भूमिकेत पाहायचे नाही.

गेल्या ५ वर्षांपासून सौम्या टंडन या मालिकेत काम करत होती. तिने अनिता भाभीची भूमिका लोकप्रिय केली होती. खाजगी कारणांमुळे काही दिवसांपूर्वीच सौम्याने ही मालिका सोडली होती. सौम्याने घेतलेल्या या निर्णयामुळे निर्मात्यांची झोप उडाली होती. त्यानंतर अनिता भाभीच्या भूमिकेसाठी अनेक नावांची चर्चा झाली. पण नेहाचे नाव कन्फर्म झाले. सौम्याने शो सोडल्यानंतर निर्मात्यांनी प्रथम या भूमिकेसाठी नेहा पेंडसे यांच्याकडे संपर्क साधला. ती त्याची पहिली पसंती होती. त्यावेळी बर्‍याच गोष्टी अडकल्या होत्या. यानंतर मेकर्सनी बर्‍याच अभिनेत्रींकडे संपर्क साधला पण ही बाब तिथेही होऊ शकली नाही. चार महिन्यांनंतर निर्मात्यांनी नेहाशी संपर्क साधला आणि करार केला. नेहा लवकरच या शोच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.

अभिनेत्री नेहा पेंडसे मराठी आणि हिंदी दोनही ठिकाणी काम केले आहे. 'बिग बॉस12' मध्ये ही नेहा दिसली होती. मराठी आणि हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. नेहा जून चित्रपटात झळकणार आहे.

टॅग्स :नेहा पेंडसेभाभीजी घर पर है