Join us  

“आपली आवड जपा पण स्वार्थी बनू नका” - अहमद खान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2018 4:43 AM

देशभरातून आलेल्या स्पर्धकांची अविश्वसनीय प्रतिभा दाखवून प्रत्येक भागासह 'नवा डान्स रिअॅलिटी शो हाय फिव्हर...डान्स' का नया तेवर आपले स्थान ...

देशभरातून आलेल्या स्पर्धकांची अविश्वसनीय प्रतिभा दाखवून प्रत्येक भागासह 'नवा डान्स रिअॅलिटी शो हाय फिव्हर...डान्स' का नया तेवर आपले स्थान भक्कम करत आहे.ऑडिशन्स दरम्यान देशभरातील केवळ १९ जोड्यांनी मेगा ऑडिशन्समध्ये आपले स्थान भक्कम केले आहे.येत्या आठवड्यात मेगा ऑडिशन्समध्ये केवळ १०० सेकंदामध्ये स्पर्धकांना परफॉर्मन्स द्यायचा आहे.यातूनच,अहमद खान,लारा दत्ता आणि डेना अलेक्सा गाला प्रिमियरकरिता या स्पर्धकांची निवड होणार की नाही याचा निर्णय घेतील.पॅनेलवरील परीक्षक तांत्रिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या फारच ठाम आणि बळकट असल्याने या स्पर्धेत पुढे जाण्यासाठी आपली कामगिरी सर्वोत्कृष्ट करणे, इतकेच स्पर्धकांना करता येणार आहे.या जोड्यांपैकी एक कंटेम्प्ररी आणि अरोबेटिक्स या नृत्यात पारंगत असलेली गौरव आणिअनुष्काची जोडी आपल्या अप्रतिम नृत्याने परीक्षकांचे मन जिंकताना दिसतील.निर्मात्यांनी यावेळी त्याच्या पालकांचा व्हिडिओ दाखवला आहे.गौरवचे पालक आपले आपल्या मुलावर किती प्रेम आहे आणि त्याने परत यावे असे सांगताना दिसणार आहेत.नृत्य हे आपले करियर बनवावे यासाठी गौरव घरातून पळून आला होता आणि अजूनही तो त्याच्या घरी परत गेलेला नाही. लारा दत्ता आणि अहमद खान यांनी कुटुंबाचे आपल्या आयुष्यात असलेले महत्त्व त्याला पटवून देण्याचा खूप प्रयत्न करूनही गौरव अजूनही आपल्या पालकांच्या भावना समजून घेऊ शकलेला नाही.अजूनही पैसा कमवून शो मध्ये आपले नाव मोठे करावे याच कल्पनेमध्ये तो रमलेला दिसला.गौरव ज्याप्रमाणे हुज्जत घालत होता, ते ऐकून अहमद खानला राग अनावर झाला आणि तो म्हणाला, “तुम्ही किती कमवावे याला काहीच मर्यादा नाहीत.पण मी अशा खूप लोकांना ओळखतो ज्यांच्याकडे प्रचंड प्रमाणात पैसा आहे पण त्यांच्या पालकांचे प्रेम मिळावे यासाठी ते तळमळत आहेत.तुझ्या डोक्यावर तुझ्या पालकांचा अजूनही हात आहे हे तुझं चांगलं नशीब आहे.तुझी स्वप्नं पूर्ण करण्यासाठी केवळ तू त्यांना इतके दुःख देत आहेस. मी तर म्हणेन फक्त पैसे नको मिळवू, तर आशीर्वाददेखील मिळव. मी २ दिवस घरी गेलो नाही तर माझी आई फार दुःखी होते आणि माझे माझ्या आईवर खूप प्रेम आहे. तू खूप काही गमावत आहेस. तुझी आवड जपण स्वार्थी बनू नकोस. जर तू निवडलेल्या करियरमध्ये तुला यश नाही मिळालं तर तुझ्यासाठी वाट पाहिलेली ही वर्ष तू त्यांना परत मिळवून देऊ शकशील का? नाही ना? मग आताच्या आता परत जाऊन त्यांना कॉल कर.”तिथे असणाऱ्या प्रत्येक उपस्थित व्यक्तीला सगळ्या परिस्थितीवर अहमदने ज्या तऱ्हेने प्रतिक्रिया दिली त्याबद्दल एक प्रकारचा धक्काच बसला.बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपले मोठे नाव कमावणाऱ्या या नृत्य दिग्दर्शकासंदर्भात या छोट्याशा गोष्टीने बरेच काही सांगितले.आपल्या जवळच्या लोकांबद्दल अहमद अतिशय भावूक असून अगदी कौटुंबिक आहे आणि त्यांची काळजी घेणारा आहे. या भावना आणि गोंधळात अहमदने सांगितलेली गोष्ट गौरवने गंभीरपणे घेतली.शेवटी गौरव आपल्या पालकांशी नीट बोलला. बघायला गेले तर हाय फिव्हर आपल्या नावाला खऱ्या अर्थाने जागला असून नृत्य आणि भावना दोन्हीकडे तापमान जरा वाढलंय, असं म्हणता येईल.