जाट की जुगनीमध्ये बरखा सिंगने केला स्टंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2017 10:40 IST
जाट की जुगनी ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच पकड घेतली ...
जाट की जुगनीमध्ये बरखा सिंगने केला स्टंट
जाट की जुगनी ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच पकड घेतली आहे. या मालिकेत ज्योतीची भूमिका बरखा सिंग साकारत आहे. बरखा सिंगने तिच्या अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. बरखाने नुकतेच एक साहसी दृश्य या मालिकेसाठी दिले. बरखाला एका दृश्यासाठी 15 फूट उंचीवर एका झाडामध्ये लपून राहायचे होते. झाड हे जास्त उंचीवर असल्याने बरखाने चढण्यासाठी कसलातरी आधार घ्यावा असे मालिकेच्या सगळ्या टीमला वाटत होते. बरखाने आधार घ्यावा यासाठी तिला अनेकवेळा विनंतीदेखील करण्यात आली. पण ती कोणत्याही आधाराशिवाय झाडावर चढली आण तिथे बसून राहिली. कोणताही आधार घेतल्यास सीनसाठी आवश्यक असलेली वास्तविकता आणि त्यामधील भीती दिसून येणार नाही असे तिचे म्हणणे होते. याविषयी बरखा सांगते, दृश्यानुसार मी माझ्या घरातून पळाली आली असून माझे भाऊ म्हणजेच यश टोंक, प्रताप आणि भीम मला शोधत आहेत आणि त्यांच्यापासून लपण्यासाठी मी झाडावर चढली असे दृश्य चित्रीत करायचे होते. कोणताच आधार न घेतल्यास मी चढली तर माझ्या अभिनयात ती भीती आपोआप दिसून येईल असे मला वाटत होते. मला अॅक्शन दृश्य चित्रीत करायला आवडत असल्याने मालिकेच्या टीमनेदेखील मला आधाराशिवाय झाडावर चढण्याची परवानगी दिली. मी देखील कोणत्याही आधाराशिवाय चढण्याचे आणि तिथे राहाण्याचे ठरवले. त्यामुळे सीनसाठी आवश्यक असलेली भीती दिसून आली. यामुळे माझा सीन अधिकाधिक चांगला झाला असे मला वाटते.