Join us  

'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'नं गाठला १००० भागांचा टप्पा ! मालिकेच्या सेटवर आले हे खास पाहुणे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 6:11 PM

'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' मालिकेने तब्बल १००० भागांचा पल्ला यशस्वीरित्या गाठला.

 कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं ही मालिका गेल्या तीन वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी मालिकेवर भरभरून प्रेम केले आणि त्यामुळेच मालिकेने तब्बल १००० भागांचा पल्ला यशस्वीरित्या गाठला. याचनिमित्ताने मालिकेच्या सेटवर थोड्या वेगळ्या प्रकारे सेलिब्रेशन करण्यात आले.

कांदिवली येथीलं we will we can foundation या NGO ७० मुलांनी सेटला भेट दिली आणि या मुलांसोबत मालिकेच्या टीमने संवाद साधला. आपल्या आवडत्या कलाकाराला समोर बघून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. टाळ्यांच्या कडकडाट सुमित पुसावळे (बाळूमामा) आणि संतोष अयाचित यांचे स्वागत त्यांनी केले. पहिल्या भागापासून ते आतापर्यंत लोकप्रियतेच्या शिखरावर रहाण सोप नाही. यामागे संपूर्ण टीम म्हणजेच मालिकेतील कलाकार, तंत्रज्ञ, मंडळी यांचा मोलाचा वाटा आहे. 

या खास प्रसंगी भेटीस आलेल्या मुलांनी त्यांच्या मनातील प्रश्न विचारले तसेच सुमितने देखील त्याचा अविस्मरणीय क्षण सांगितला. सुंदरा म्हणजेच बाळूमामांची आई आणि बाळूमामा यांची मालिकेतील शेवटची भेट ज्यामध्ये बाळूमामा सांगतात आता आपली भेट वैकुंठात तो सीन कधीच विसरणार नाही असे त्याने सांगितले. असे अजून काही किस्से सांगत ही गप्पांची मैफल रंगत गेली. जेव्हा बाळूमामा या व्यक्तिरेखेसाठी निवडला गेलो हे मला कळाले तेव्हा आईला ही गोड बातमी सांगताना मला अश्रु अनवार झाले असे देखील त्याने यावेळेस सांगितले. एका चिमुकलेने सुमितला पुष्प देऊन बाळुमामाच्या नावानं चांगभलं असे म्हंटले तेव्हा सगळ्यांनाच कौतुक वाटले.

टॅग्स :कलर्स मराठी