...आता स्त्री वेशात अतुल तोडणकर करणार धमाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2017 14:33 IST
‘ग सहाजणी’ ही विनोदी मालिका सध्या प्रेक्षकांना खळखळून हसविण्यात यशस्वी ठरत आहे. मालिकेतील पात्र आणि घडणाºया घटना वास्तवाशी मिळत्या-जुळत्या ...
...आता स्त्री वेशात अतुल तोडणकर करणार धमाल
‘ग सहाजणी’ ही विनोदी मालिका सध्या प्रेक्षकांना खळखळून हसविण्यात यशस्वी ठरत आहे. मालिकेतील पात्र आणि घडणाºया घटना वास्तवाशी मिळत्या-जुळत्या असल्याचा भास होत असल्याने प्रेक्षक मालिकेतील पात्रांच्या प्रेमात पडले आहेत. आता अतुल तोडणकर हा विनोदी कलाकार मालिकेत रंगत आणण्यासाठी स्त्री वेशात झळकणार आहे. त्याने त्याच्या स्त्रीवेशाचा एक फोटो नुकताच फेसबुकवर शेअर केला असून, त्याचा हा नवा अवतार प्रेक्षकांना खळखळून हसविणार हे निश्चित आहे. जीवनातील मर्म अगदी चपखल पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न या मालिकेतून केला जात आहे. दैनंदिन घटनांचा त्यातून निर्माण होणाºया प्रश्नांचे हसतखेळत समाधान करणारी ही मालिका संपूर्ण महाराष्ट्रात आवडीने पाहिली जात आहे. सध्या सुरू असलेल्या चलन बदलाचा विषय या मालिकेत अतिशय खुबीने हाताळण्यात आला होता. या एपिसोडमध्ये अभिनेत्री मानसी नाईक ही बँकेत पाहुणी कलाकार म्हणून दाखविण्यात आली होती. हजार आणि पाचशे रु पयांच्या चलनबदलांमुळे कामाचा अतिरिक्त ताण पडलेल्या मालिकेतील शर्वणी पिल्लई (मीना मोडक), नियती राजवाडे (दामिनी), नम्रता आवटे (जुबेदा), पौर्णिमा अहिरे (भीमा), सुरभी भावे (सुश्मिता) आणि मौसमी तोडवळकर (कामिनी) या सहाजणींसोबत मानसीने जबरदस्त धमाल केली होती. बँकेचे खडूस मॅनेजर धबडगावकर म्हणजेच अतुल तोडणकर यांची धमाल मस्ती तर याभागात चर्चेचा विषय ठरली होती. अतुलने आपल्या नेहमीच्या अंदाजात हास्यविनोदाच्या फटकाºयात चलनबदलाचा गंभीर विषय मनोरंजक पद्धतीने हाताळला होता. त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसादही मिळाला होता. बँकेतील कर्मचाºयांचे भावविश्व मांडणाºया या एपिसोडनंतर अतुल आता स्त्रीवेशात काय धमाल करणार हे बघणे मात्र औत्सुक्याचे ठरणार आहे.