Join us  

पटियाला बेब्स फेम अशनूर कौर अशाप्रकारे साधतेय काम आणि अभ्यास यात समतोल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 7:15 AM

अशनूर सध्या मुंबईतील एका मोठ्या शाळेत दहावीत शिकत आहे. अगदी लहानपणापासून तिला अभिनयाचे वेड होते. वयाच्या पाचव्या वर्षीच तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पण अभिनयाइतकीच ती शिक्षणात देखील हुशार आणि तेजस्वी आहे.

ठळक मुद्देअशनूर सेटवर आपली पुस्तके घेऊन येते आणि मोकळ्या वेळेचा उपयोग करून अभ्यास करते. अगदी लहान वयातच वेळेचे व्यवस्थापन करायला ती शिकली आहे. त्यामुळे ती प्रत्येक वर्षी चांगले यश संपादन करते.

शिक्षण हा आपल्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे आणि उज्ज्वल भविष्यासाठी ते आवश्यक आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करणार असलात, तरी शिक्षणावर लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे असते. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर अलीकडेच सुरू झालेल्या पटियाला बेब्स या मालिकेत मिनीची भूमिका करणारी अशनूर कौर हे महत्त्व जाणते. अशनूर सध्या मुंबईतील एका मोठ्या शाळेत दहावीत शिकत आहे. अगदी लहानपणापासून तिला अभिनयाचे वेड होते. वयाच्या पाचव्या वर्षीच तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पण अभिनयाइतकीच ती शिक्षणात देखील हुशार आणि तेजस्वी आहे. तिने कधीच आपल्या अभ्यासाकडे दुर्लक्ष केलेले नाही. आपल्या अभ्यासालाही ती सारखेच महत्त्व देते आणि काम आणि अभ्यास यांच्यात समतोल साधते. आगामी बोर्डाच्या परीक्षेसाठी तिने अगोदरपासूनच तयारी सुरू केलेली आहे. आपले ईप्सित साध्य करण्यासाठी ती कसून प्रयत्न करत आहे. अशनूर सेटवर आपली पुस्तके घेऊन येते आणि मोकळ्या वेळेचा उपयोग करून अभ्यास करते. अगदी लहान वयातच वेळेचे व्यवस्थापन करायला ती शिकली आहे. त्यामुळे ती प्रत्येक वर्षी चांगले यश संपादन करते. आपल्या अभ्यासाबद्दल बोलताना अशनूर कौर म्हणजे मिनी सांगते, “काम आणि अभ्यास यांच्यातील तोल सांभाळणे हे थोडे कठीण आहे. पण इच्छा असली तर सर्व काही जमते. माझ्या अभ्यासाच्या बाबतीत मी खूप काटेकोर आहे आणि कोणत्याही परिस्थितीत त्याकडे दुर्लक्ष करत नाही. मला चांगले गुण मिळवून उत्तीर्ण व्हायचे आहे, जेणेकरून माझ्या आई-वडिलांना माझा अभिमान वाटेल. ज्याला मनापासून शिकायचे असते, तो कितीही धकाधकीच्या दिवसानंतर अभ्यास करण्यासाठी वेळ आणि बळ मिळवतोच. माझे आईवडील आणि शाळा मला खूप आधार देतात, ज्यामुळे माझ्यासाठी हा तोल सांभाळणे सोपे होते.” पटियाला बेब्स ही बबिता आणि मिनी यांची गोष्ट आहे. आई आणि तिच्या मुलीतील भावबंधाची ही गोष्ट आहे, ज्यात मुलगी आपल्या आईला केवळ आकांक्षांचे पंखच देत नाही, तर आकाशात भरारी घेण्याचा विश्वासही देते. अनोखी गोष्ट आणि त्याचे वास्तववादी चित्रण यामुळे प्रेक्षकांनी या मालिकेचे चांगले स्वागत केले आहे. बबिता आणि मिनी यांना ही गोष्ट समजते की, मिनीचे वडील अशोक हे लंडनमध्ये दुसर्‍या एका स्त्रीशी संबंध ठेवून आहेत आणि त्यांना तिला घरी घेऊन यायचे आहे. बबिताला हे जाणवते की, अशोकचे तिच्यावर कधीच प्रेम नव्हते. मिनीला जेव्हा हे लक्षात येते की, आपल्या वडिलांना आपल्या आईत रस नाही तेव्हा ती आपल्या आईच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहते आणि तिला सांगते की तिला प्रेमाची आणि त्याच्या अवधानाची भीक मागण्याची गरज नाही. या माय-लेकी एकमेकींच्या आधाराने, आपल्याला हवे तसे आयुष्य जगण्यासाठी घराबाहेर पडून नव्याने सुरुवात करतात.