Join us  

"खड्ड्यात जा ...", सलमानने अश्नीर ग्रोव्हरसोबत फोटो काढण्यास दिलेला नकार, भडकलेला शार्क टँकचा परीक्षक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 11:01 AM

अश्नीर ग्रोव्हर यांनी नुकतीच एका पॉडकास्टला हजेरी लावली. यामध्ये त्यांनी सलमानबरोबर घडलेला एक किस्सा शेअर केला.

टीव्हीवरील अनेक लोकप्रिय शोपैकी एक म्हणजे 'शार्क टँक इंडिया'. या शोमधून उद्योगपती अश्नीर ग्रोव्हर प्रसिद्धीझोतात आले. या शोमुळे त्यांच्या चाहत्या वर्गातही भर पडली. अश्नीर ग्रोव्हर त्यांचा बेधडक स्वभाव आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. सध्या त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियीवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत त्यांनी बॉलिवूडचा भाईजान सलमान खानबरोबर घडलेला एक किस्सा सांगितला आहे. 

अश्नीर ग्रोव्हर यांनी नुकतीच एका पॉडकास्टला हजेरी लावली. यामध्ये त्यांनी सलमानबरोबर घडलेला एक किस्सा शेअर केला. ते म्हणाले, "मी सलमान खानला भेटलो आहे. त्याला आम्ही स्पॉन्सर ठेवलं होतं. तेव्हा शूटदरम्यान आमची भेट झाली होती. शूटिंगच्या आधी त्याला कंपनीबद्दल सांगण्यासाठी भेटलो होतो. दोन-तीन तास आमचं संभाषण झालं. त्यानंतर त्याचा मॅनेजर येऊन मला म्हणाला की फोटो नका काढू, सरांना वाईट वाटतं. मी त्याला म्हणालो, नाही काढणार फोटो. खड्ड्यात जा तू . म्हणजे ही काय हिरोपंती आहे." 

त्यानंतर अश्नीर ग्रोव्हर यांनी सलमानचं कौतुकही केलं. "पण, तो खूप स्मार्ट आहे. लोकांना वाटतं की तो हवेत आहे. पण, तो खरंच स्मार्ट आहे. त्याला व्यवसाय आणि ब्रँडिंग या गोष्टी समजतात. त्याची प्रतिमा काय आहे, हे त्याला माहीत आहे," असंही ते पुढे म्हणाले.

पुढे त्यांनी सांगितलं, "जेव्हा आम्ही जाहिरात करत होतो. तेव्हा त्याने सांगितलं होतं की हे बघा मला थोडं महान व्यक्तिमत्व दाखवा. मी ट्यूबलाईट चित्रपट केला होता. तो बॉक्स ऑफिसवर आपटला. कारण, मी त्यात मंदबुद्धी असलेल्या व्यक्तीची भूमिका साकारली होती. आणि हे लोकांना आवडलं नव्हतं."

टॅग्स :सलमान खानसेलिब्रिटी