Join us

​मेरे साई या मालिकेच्या सेटवर या कारणाने खूश झाले कलाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2018 09:58 IST

सहसा असे म्हटले जाते की, प्रत्येक मूल दैवी सामर्थ्याचे प्रतिनिधित्व आहे. निष्पाप हसू असलेली मुले आणि त्यांचे आनंददायी हास्य ...

सहसा असे म्हटले जाते की, प्रत्येक मूल दैवी सामर्थ्याचे प्रतिनिधित्व आहे. निष्पाप हसू असलेली मुले आणि त्यांचे आनंददायी हास्य सर्वांमध्ये आनंद पसरवतात.... सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनच्या 'मेरी साई' या शोमध्ये नुकत्याच दाखवण्यात आलेल्या साई बाबांच्या एका कथेने प्रेक्षकांचे मन जिंकले. आणि आता या मालिकेमध्ये एक नवी एंट्री होणार आहे. रुक्मिणीचे पात्र शोमध्ये एका बाळासोबत दिसणार आहे. या बाळाच्या आगमनाने सेटवरचे सगळेच खूप खूश झाले आहेत. सेटवरील प्रत्येकजण बाळाच्या प्रेमात पडला आहे. संपूर्ण कास्ट या सुंदर बाळाचे लाड करत आहे. चित्रीकरणादरम्यान मिळणाऱ्या वेळातून ते या बाळासोबत जास्तीत जास्त वेळ घालवताना दिसत आहेत. साईबाबांची प्रमुख भूमिका साकरणाऱ्या अबीर सुफीला तर हे बाळ खूप आवडते  आणि तो त्याची खूप काळजी घेतो. याविषयी अबीर सांगतो, "मला मुलांसोबत वेळ घालवायला आणि त्यांच्याबरोबर खेळायला खूप आवडते. मुले आपल्याला जीवनाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला शिकवतात. साई बाबा सुद्धा मुलांवर खूप प्रेम करत होते. ते नेहमीच लहान मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत असत. त्यांच्या जीवनातील सर्वात संस्मरणीय घटनांपैकी एक घटना देखील लहान मुलींशी संबंधीत आहे. त्यांनी द्वारकामाई येथे दिवाळीच्या पूर्वसंध्येला त्यांची भक्त झिपरीला आनंद देण्यासाठी पाण्याचा वापर करून अनेक दिवे लावले होते. मी बाळाला माझ्या हातात धरून ठेवतो तेव्हा मला फार आनंद होतो, त्याचे हसणे खूप सुंदर आहे. तो क्वचितच रडतो. आम्ही सर्वजण बाळाची काळजी घेतो आणि नियमित वेळा त्याला खायला देतो. जेव्हा तुम्ही बाळाला आपल्या मांडीवर घेता आणि तो तुमच्या हाताचे बोट त्याच्या लहान हाताने धरतो. तेव्हाची भावना खरोखरच एक वेगळी असते!"मेरे साई मधील आगामी भागात कुलकर्णी (वैभव मांगले) यांची पत्नी रुक्मिणी तिच्या कुटुंबापासून विलग झाली असल्याचे पाहायला मिळणार आहे तर दुसरीकडे तिच्या भावाची बायको एका मृत मुलाला जन्म देणार आहे आणि साई बाबांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी बोलावणार आहे. साई बाळाला कसे वाचवणार? हे प्रेक्षकांना मालिकेच्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळेल. Also Read : ​‘मेरे साई’ या मालिकेच्या सेटवर तोरल रासपुत्रला या नावाने मारली जाते हाक