Join us  

तारक मेहता मधील हा कलाकार केवळ कमवायचा ५० रुपये, आता आहे दोन हॉटेलचा मालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 2:27 PM

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील जेठा, दया, माधवी भिडे, आत्माराम भिडे, रोशनसिंग सोठी, अय्यर, बबिता, कोमल, पोपटलाल, अब्दुल या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत.

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांची चांगलीच आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेचे नुकतेच दहा वर्षं पूर्ण झाले आहेत. कोणत्याही कॉमेडी मालिकेने प्रेक्षकांचे इतके वर्षं मनोरंजन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या मालिकेतील जेठा, दया, माधवी भिडे, आत्माराम भिडे, रोशनसिंग सोठी, अय्यर, बबिता, कोमल, पोपटलाल, अब्दुल या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. या मालिकेला दहा वर्ष झाली असली तरी या मालिकेची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाहीये. ही मालिका प्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन करत आहे. टिआरपीच्या रेसमध्ये तर ही मालिका नेहमीच अव्वल राहिली आहे.

या मालिकेत अब्दुल ही व्यक्तिरेखा शरद सांकला साकरात आहे. शरद गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम करत आहे. पण त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमुळे त्याचे संपूर्ण करियरच बदलले. या मालिकेने त्याला पैसा, प्रसिद्धी सगळे काही मिळवून दिले. 

शरदने १९९० साली आलेल्या वंश या चित्रपटापासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यात त्याने चार्ली चॅप्लिनची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याची भूमिका खूपच छोटीशी होती. त्यावेळी त्याला एका दिवसाचे चित्रीकरण करण्यासाठी केवळ ५० रुपये मिळायचे. त्यानंतर त्याने बादशाह, बाजीगर यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. तसेच हम सब एक है या मालिकेत देखील तो झळकला होता. पण त्याला काही केल्या प्रसिद्धी मिळत नव्हती. एक वेळ तर अशी होती की, त्याच्याकडे जवळजवळ आठ वर्षं काम नव्हते. तो केवळ पोर्टपोलिओ घेऊन निर्मात्यांकडे चकरा मारायचा. त्या दरम्यान त्याने असिस्टंट डायरेटक्टर, कोरिओग्राफर एवढेच काय तर कास्टिंग डायरेक्टर म्हणून देखील काम केले. याच दरम्यान त्याला तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेची ऑफर मिळाली. या मालिकेचे निर्माते असित मोदी आणि शरद एकाच कॉलेजमध्ये होते. त्यामुळे त्या दोघांची अनेक वर्षांपासून ओळख होती. त्यामुळे अब्दुल या भूमिकेसाठी त्यांनी शरदला विचारले आणि त्याला ही मालिका मिळाली. या मालिकेतील त्याची व्यक्तिरेखा प्रचंड प्रसिद्ध झाली आणि लोक त्याला अब्दुल या नावानेच ओळखू लागले. या मालिकेनंतर त्याने जुहूमध्ये आणि अंधेरीमध्ये रेस्टॉरंट सुरू केले. 

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा