Join us  

लग्नानंतर काश्मीरपासून दूर झाली होती ही अभिनेत्री, कलम ३७० हटविल्यामुळे झाली खूश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2019 6:55 PM

छोट्या पडद्यावरील या काश्मीरी अभिनेत्रीनं नॉन काश्मीरी अभिनेत्यासोबत लग्न केल्यामुळे काश्मीरपासून दूर झाली होती.

जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटविल्यामुळे देशात आनंदाचं वातावरण आहे. बॉलिवूडपासून सामान्य जनता या निर्णयाचं कौतूक करत आहेत. यादरम्यान मेरे अंगने में फेम काश्मिरी अभिनेत्री एकता कौल हिनेदेखील कलम ३७० हटविल्यामुळे आनंद व्यक्त केला आहे. एकता कौल काश्मिरी असून तिने नॉन काश्मिरी अभिनेता सुमीत व्याससोबत लग्न केल्यानंतर तिला नॉन काश्मिरी जाहीर केलं होतं. 

याबाबत एकता म्हणाली की, ‘मला बाबांनी सकाळी उठवलं आणि टीव्ही पाहायला सांगितला. ही बातमी पाहून मला खूप आनंद झाला. पुन्हा एकदा ते माझं राज्य झालं. सरकारच्या निर्णयामुळे आम्ही सगळेच आनंद साजरा करत आहोत.

तिने पुढे सांगितलं की, लग्नानंतर मला जाणीव झाली की गोष्टी किती पटकन बदलल्या. आता किती गोष्टी मी करू शकत नाही आणि अनेक गोष्टींचा हिस्साही मी राहिलेली नव्हते. सगळ्या गोष्टी अचानक वाईट पद्धतीने बदलल्या. मला नेहमी काश्मिरमध्ये जमीन विकत घ्यायची होती. मला नेहमीच तिथे परत जायचं होतं. पण लग्नानंतर सगळ्या गोष्टी अचानक बदलल्या. मी काश्मिरचा भाग राहिली नव्हती. पण आता मला आशा आहे की गोष्टी बदलतील.

कलम ३७० नुसार काश्मिरच्या मुलींनी बाहेरील राज्यातील मुलांशी लग्न केलं तर त्यांची राज्याची नागरिकता जायची. पण आता कलम ३७० हटवल्यामुळे काश्मिरी महिला भारत किंवा जगभरातील कोणत्या पुरुषाशी लग्न करू शकते. यामुळे त्यांचं नागरिकत्त्व जाणार नाही.

एकताचा जन्म काश्मीरमध्ये झाला होता. २०१७मध्ये तिने अभिनेता सुमित व्यासशी लग्न केलं.

टॅग्स :कलम 370