Join us  

'ठरलं तर मग', 'सुख म्हणजे नक्की काय असतं'शिवाय या मालिकेत पाहायला मिळणार पाडव्याचा गोडवा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 6:00 AM

ठरलं तर मग, सुख म्हणजे नक्की काय असतं, सहकुटुंब सहपरिवार आणि ठिपक्यांची रांगोळी मालिकेत पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा होणार आहे.

मराठी नववर्षाचं दिमाखात स्वागत करण्यासाठी स्टार प्रवाहचा संपूर्ण परिवार सज्ज आहे. ठरलं तर मग, सुख म्हणजे नक्की काय असतं, सहकुटुंब सहपरिवार आणि ठिपक्यांची रांगोळी मालिकेत पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा होणार आहे. मालिकेतील पाडव्याचा जल्लोष पाहण्यासाठी प्रेक्षकदेखील उत्सुक आहेत. 

ठरलं तर मग मालिकेत नुकतेच अर्जुन आणि सायलीचे लग्न पार पडले. भलेही हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असले तरीही घरतल्यांसाठी हे कायदेशीर लग्न आहे. त्यामुळे सर्व सण ते साजरा करत आहेत. आता अर्जुन आणि सायलीचा लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा असल्याने सायली आणि अर्जुन गुढीची पूजा करणार आहेत. 

सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील मोरे कुटुंबात दरवर्षी उत्साहात गुढी उभारली जाते. गुढीच्या पुजेची सर्व तयारी पश्या करत असे. यावर्षी मात्र पश्या नाही त्यामुळे पूजा होणार की नाही अश्या विचारत असताना पश्या गुपचूप पुजेची तयारी करुन जातो. त्यामुळे सरु वहिनीला खात्री आहे की पश्या आसपासच आहे. यंदा पश्यासाठी मोरे कुटुंब एकत्र येऊन गुढी उभारणार आहेत. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील जयदीप गौरीसाठी यंदाचा गुढीपाडवा खास असणार आहे.

दोघांच्या आयुष्यात चिमुकल्या लक्ष्मीचं आगमन झाल्यामुळे लक्ष्मीसोबत जयदीप-गौरी गुढीपाडवा साजरा करणार आहेत. ठिपक्यांची रांगोळी मालिकेतही कानेटकर कुटुंबाने आनंदाची गुढी उभारली आहे. तेव्हा पाहायला विसरु नका स्टार प्रवाहवरील मालिकांचे गुढीपाडवा विशेष भाग.

टॅग्स :स्टार प्रवाहगुढीपाडवा २०१८