Join us

और एक नाटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2016 11:08 IST

मे आय कम इन मॅडम या मालिकेत साजन नेहमी वेगवेगळ्या भूमिका साकारत असतो. तो कधी कामवाली बनतो तर कधी ...

मे आय कम इन मॅडम या मालिकेत साजन नेहमी वेगवेगळ्या भूमिका साकारत असतो. तो कधी कामवाली बनतो तर कधी तो आणखी काही करतो. आता तो त्याची बॉस संजनाला खूश करण्यासाठी आचारी बनणार आहे. आचारी बनून तो संजनाला स्वयंपाक करायला शिकवणार आहे. खऱ्या आयुष्यात साजनची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या संदीप आनंदला काहीच स्वयंपाक येत नाही. याविषयी संदीप सांगतो, "चित्रीकरण करताना एखाद्या पदार्थात काय टाकायचे आहे तेच मी विसरायचो. एवढेच नाही तर काही वेळा पदार्थात टाकल्या जाणाऱ्या साहित्यांची नावेही विसरायचो. यामुळे चित्रीकरण सुरू असताना नेहा पेंडसे खूप हसायची."