Join us  

असित मोदीसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करून काय सांगण्याचा प्रयत्न करतेय दिशा वाकानी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 12:31 PM

दिशा वाकानीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो तिच्या लग्नातील असून या फोटोत ती, तिचे पती तसेच तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांना आपल्याला पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देदिशाने हा फोटो पोस्ट केल्यानंतर दिशा तू लवकरात लवकर मालिकेत परत ये... असे तिच्या चाहत्यांनी तिला कमेंटद्वारे सांगितले आहे. तसेच दिशा तारक मेहताच्या परिवारात पुन्हा लवकरच सामील होणार असल्याचा अंदाज या फोटोमुळे नेटकऱ्यांकडून लावण्यात येत आहे. 

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे आणि त्यामुळे या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना त्यांच्यातील एक वाटू लागल्या आहेत आणि त्यातही या मालिकेतील दयाबेन ही भूमिका तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेमुळे दिशा वाकानीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. आज प्रेक्षक दिशाला दयाबेन म्हणूनच ओळखतात. 

दिशा वाकानी गेल्या अनेक महिन्यांपासून मालिकेतून गायब आहे. दिशाने गेल्या वर्षी एका गोंडस मुलीला जन्म दिला. दिशा गरोदर असताना देखील मालिकेचे चित्रीकरण करत होती. पण आता तिची मुलगी लहान असल्याने ती मालिकेपासून दूर आहे. आता प्रेक्षकांची लाडकी दया मालिकेत केव्हा परतेल याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. दिशाने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर या मालिकेचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यावर तिने मालिकेत लवकरच परत यावे असे तिच्या चाहत्यांनी कमेंटद्वारे म्हटले होते. तसेच तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत तारकच्या भूमिकेत असलेल्या शैलेष लोढाने देखील टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत दिशाच्या परतीचे संकेत दिले होते. आणि आता दिशाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे ती लवकरच मालिकेत परतणार या चर्चेला उधाण आले आहे.

दिशा वाकानीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो तिच्या लग्नातील असून या फोटोत ती, तिचे पती तसेच तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांना आपल्याला पाहायला मिळत आहे. दिशाच्या लग्नातील विधी दरम्यानचा हा फोटो असून असित एखाद्या कुटुंबियांतील सदस्याप्रमाणे या फोटोत लग्नाच्या विधीत सामील होताना दिसत आहेत. या फोटोसोबत लव्ह थिस पिक्चर (मला हा फोटो खूप आवडतो) असे कॅप्शन दिशाने दिले आहे. 

दिशाने हा फोटो पोस्ट केल्यानंतर दिशा तू लवकरात लवकर मालिकेत परत ये... असे तिच्या चाहत्यांनी तिला कमेंटद्वारे सांगितले आहे. तसेच दिशा तारक मेहताच्या परिवारात पुन्हा लवकरच सामील होणार असल्याचा अंदाज या फोटोमुळे नेटकऱ्यांकडून लावण्यात येत आहे. 

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मादिशा वाकानी