Join us  

विरुष्कानंतर आणखीन एका सेलिब्रेटी कपलने दिली गुड न्यूज!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 11:36 AM

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी नुकतीच गोड बातमी दिली आहे. त्यानंतर आता आणखीन एका अभिनेत्याने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. 

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी नुकतीच गोड बातमी दिली आहे. त्यानंतर आता आणखीन एका अभिनेत्याने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. नागिन 2 मधील अभिनेता करणवीर बोहरा पुन्हा बाबा होणार आहे. करणवीरला त्याची पत्नी तीजे सिद्धूने दिलेले हे स्पेशल बर्थडे गिफ्ट आहे. दोन जुळ्या मुलींनंतर त्यांच्या घरी पुन्हा एकदा पाळणा हलणार आहे.

करणवीरने नुकताच 37 वा बर्थडे साजरा केला आहे. त्यानिमित्ताने आपल्या पत्नीने दिलेल्या या स्पेशल गिफ्ट त्याने आपल्या चाहत्यांनाही सांगितलं आहे. करणवीर आणि तीजेने आपल्या सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केली आहे. दोघांनीही आपल्या या खास क्षणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

तीजे सिद्धूने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या बेबी बंपसह फोटो ठेवला आहे. यामध्ये करणवीर तिच्यासह आहे. दोघांनीही बेबी बंपवर हात ठेवत पोझ दिली आहे. तीजे म्हणाली, "आम्हाला अनेक आशीर्वाद मिळाले आहेत आणि आता आणखी एक मिळतो आहे. प्रत्येक आत्म्याचा एक उद्देश असतो. आपण त्याला निवडत नाही, ते आपल्याला निवडतात. आम्ही तुझ्यासाठी योग्य आहोत याचा विश्वास ठेवल्याबद्दल चिमुकल्या आम्ही तुझे खूप आभारी आहोत. 

तर करणवीरने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये दोघेही मातीचे छोटे बाळ घडवताना दिसत आहेत. करणवीर म्हणाला, आपल्यामार्फत मुले या जगात येतात, मात्र सर्व काही देवाच्या हातात असते. तो खरा निर्माता आहे, तोच सर्वकाही नीटपणे घडवतो आणि आपण फक्त त्याच्या आशीर्वादाची वाट पाहत होतो. आम्हाला असे सरप्राइझ दिल्यामुळे मी देवाचे आभार मानतो. आम्हाला पुन्हा आईबाबा होण्याासाठी निवडले. माझ्यासाठी हे सर्वात अनमोल असे बर्थडे गिफ्ट आहे.

फक्त करणवीर आणि तीजेच नाही तर त्यांच्या मुली बेला आणि व्हिएनाचेदेखील इन्स्टाग्राम पेज आहे. त्यावरदेखील आपल्या दोन्ही मुलींचे फोटो टाकून त्यांच्यासमोर 2016, 2016 असे लिहिले आहे आणि 2020 समोर त्यांनी छोटेसे दोन शूज दाखवले आहेत.

करणवीर आणि तीजे 2006 साली लग्न बेडीत अडकले. 2016 साली त्यांना जुळ्या मुली झाल्या.  करणने क्यों की साँस भी कभी बहू थी, शरारत, कसौटी जिंदगी की, नागिन 2 या मालिकेत काम केले आहे. याशिवाय तो खतरों के खिलाडी, बिग बॉस 12 या रिएलिटी शोमध्येही सहभागी झाला होता.

टॅग्स :करणवीर बोहराअनुष्का शर्माविराट कोहली