इश्कबाजनंतर आता दिल बोले ऑबेरॉय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2017 10:22 IST
एखादा चित्रपट हिट झाला की त्या चित्रपटाचा सिक्वल आपल्याला पाहायला मिळतो. बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांचे सिक्वल आले आहेत. चित्रपटांच्या सिक्वलचा ...
इश्कबाजनंतर आता दिल बोले ऑबेरॉय
एखादा चित्रपट हिट झाला की त्या चित्रपटाचा सिक्वल आपल्याला पाहायला मिळतो. बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांचे सिक्वल आले आहेत. चित्रपटांच्या सिक्वलचा ट्रेंड आता प्रेक्षकांना छोट्या पडद्यावरदेखील पाहायला मिळणार आहे. इश्कबाज ही मालिका सध्या प्रेक्षकांना खूप आवडत आहे. ऑबेरॉय कुटुंबाच्या लोक प्रेमात पडले आहेत. या मालिकेचा टीआरपीदेखील खूप चांगला आहे. त्यामुळे या मालिकेची लोकप्रियता पाहाता मालिकेच्या निर्मात्यांनी या मालिकेची एक हलकीफुलकी आवृत्ती लोकांच्या भेटीस आणण्याची ठरवली आहे. या कार्यक्रमाचे नाव दिल बोले ऑबेरॉय असे असून इश्कबाज या मालिकेच्याच मूळ कथेचीच ही पुढील आवृत्ती असणार आहे. दिल बोले ऑबेरॉय या मालिकेत ओंकारसिंह म्हणजेच कुणाल जयसिंग आणि रुद्रसिंग म्हणजेच लीनेश मट्टूच्या प्रेमजीवनावर अधिक प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. या मालिकेत काही नवीन कलाकाराचीदेखील एंट्री होणार आहे. ओंकारच्या नायिकेच्या भूमिकेत या मालिकेत श्रेणू परिख झळकणार आहे. श्रेणू दोन वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. तसेच या मालिकेत सुश्मिता मुखर्जी खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. मालिकेत सुश्मिता दादीच्या बहिणीची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेविषयी सुश्मिता सांगते, "या मालिकेत मी साकारात असलेली भूमिका ही नकारात्मक आहे. मी माझ्या कारकिर्दीत आतापर्यंत अनेक खलनायिकेच्या भूमिका साकारल्या आहेत आणि माझ्या या भूमिकांना प्रेक्षकांची पसंतीदेखील दिली आहे. मी अनेकवेळा खलनायिकेच्या भूमिकेत दिसत असली तरी प्रत्येक भूमिकेत काहीतरी नवीन करण्याचा मी प्रयत्न करते. त्यामुळेच मी आजही टिकून आहे. इश्कबाज ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. याच मालिकेच्या एका आवृत्तीत मला काम करायला मिळत असल्याने मी खूप खूश आहे."