Join us  

ट्रोल झाल्यानंतर अपूर्वाने ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर, वाचा काय म्हणाली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 11:19 AM

काही नेटिझन्सनी अपूर्वाला या प्रोमोवरून ट्रोल करण्याचा प्रयत्न केला तेव्हा अपूर्वाने शांत न बसता त्या ट्रॉलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.

लवकरच अपूर्वा 'तुझं माझं जमतंय 'या आगामी मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो देखील रिलीज झाला आणि अपूर्वाच्या पम्मी या नव्या व्यक्तिरेखेची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली. पम्मीला पाहून प्रेक्षक शेवंताला विसरून जातील आणि पम्मीच्या प्रेमात पडतील असं मत अपूर्वाने व्यक्त केलं होतं. सोशल मीडियावर देखील प्रेक्षकांनी या प्रोमोला उदंड प्रतिसाद दिला. पण काही नेटिझन्सनी अपूर्वाला या प्रोमोवरून ट्रोल करण्याचा प्रयत्न केला तेव्हा अपूर्वाने शांत न बसता त्या ट्रॉलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.

 

 प्रोमो पाहून एका युजरने तुमचा लुक पाहता सगळे सिरियलवाले तुम्हाला बाहेरवालीचाच रोल देतात का? अशी कमेंट केली. त्यावर अपूर्वाने, "या सिरियलचा एकही एपिसोड टेलिकास्ट पण नाही झाला, तुम्ही आधीच ठरवून टाकलंत?" असं म्हणत त्या ट्रोलरची बोलती बंद करून टाकली. तसंच त्या ट्रोलरच्या सोशल मीडियावरील यूजरनेमवर निशाणा साधत अपूर्वा म्हणाली कि, "आणि मुळात कसंय, इनोसंट बॉय नाव ठेवून तुम्ही पण इनोसंट होत नाही ना." अपूर्वाच्या या बिनधास्त आणि निर्भीड स्वभावाच्याच चाहते प्रेमात आहेत. आता अपूर्वाची नवीन व्यक्तिरेखा पम्मीदेखील अशीच बिनधास्त आणि निर्भीड असणार आहे का हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

‘रात्रीस खेळ चाले 2’ मालिका संपली, शेवंता गहिवरली...! इन्स्टा लाईव्हमध्ये चक्क रडली!!

'रात्रीस खेळ चाले २' मालिकेचा 29 आॅगस्टला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला आणि शेवंता अर्थात अपूर्वा नेमळेकर कमालीची भावूक झाली. इन्स्टाग्रामवर भावूक पोस्ट लिहून तिने आपल्या भावना व्यक्त केल्यात. लाईव्ह सेशनमध्ये तिला अश्रू रोखता आले नाहीत.‘आपली लाडकी मालिका म्हणजे रात्रीस खेळ चाले 2 ही मालिका आपला निरोप घेत आहे. आता तो वाडा नसणार, आता शूटींग नसणार... खूप भावना दाटून आल्या आहेत. तुम्ही मला भरभरून प्रेम दिले. मी साकारलेल्या शेवंता या व्यक्तिरेखेवर प्रेम केलेत. या मालिकेचा अविभाज्य भाग म्हणून मला प्रेक्षकांची पसंती मिळाली. तुम्हा सर्वांचे मी मनापासून आभार मानते.

अपूर्वा नेमळेकरच्या अदा, सोशल मीडियावरील फोटोवर रसिक फिदा

पाहा VIDEO, रात्रीस खेळ चाले फेम शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर विकतेय पाणीपुरी

टॅग्स :अपूर्वा नेमळेकर