Join us  

ड्रग्ज प्रकरणात समोर आले सीता और गीता फेम गौरव दीक्षितचे नाव, घरात सुरू होते ड्रग्जचे पॅकिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2021 7:17 PM

गौरवच्या लोखंडवाला फ्लॅटमधून ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला असून तिथे ड्रग्जचे पॅकिंग सुरू होते. 

ठळक मुद्देअमली पदार्थविरोधी नियंत्रण कक्षाने (एनसीबी) गौरवच्या घरावर छापा टाकल्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज आणि पॅकिंगचे सामान मिळाले. त्याच्या घरात ड्रग्जचे पॅकिंग सुरू होते हे यावरून स्पष्ट झाले आहे.

बॉलिवूड अभिनेता एजाज खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर आता गौरव दीक्षित या अभिनेत्याचे नाव ड्रग्ज प्रकरणात आले आहे. गौरवच्या लोखंडवाला फ्लॅटमधून ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला असून तिथे ड्रग्जचे पॅकिंग सुरू होते. 

अमली पदार्थविरोधी नियंत्रण कक्षाने (एनसीबी) गौरवच्या घरावर छापा टाकल्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज आणि पॅकिंगचे सामान मिळाले. त्याच्या घरात ड्रग्जचे पॅकिंग सुरू होते हे यावरून स्पष्ट झाले आहे. गौरवच्या घरावर छापा टाकण्याआधीच गौरव आणि त्याची प्रेयसी फरार झाली होती. त्याची प्रेयसी ही विदेशी आहे. 

बॉलिवूड अभिनेता एजाज खानचा ड्रग्ज तस्कराशी संबंध असल्याच्या आरोपावरून अमली पदार्थविरोधी नियंत्रण कक्षाने (एनसीबी) त्याला नुकतीच अटक केली आहे. ड्रग्ज माफिया फारूख बटाटा आणि त्याचा मुलगा शादाब बटाटा याच्याशी अमली पदार्थ विक्री आणि सेवन व्यवहारात त्याचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या सगळ्यांची सध्या एनसीबीकडून कसून चौकशी सुरू होती. या चौकशीदरम्यान त्याने गौरव दीक्षितचे नाव घेतले आहे. 

एजाज खान बिग बॉसच्या सातव्या सिझनमध्ये झळकला होता. त्याने काही चित्रपट आणि मालिकांमध्ये देखील काम केले आहे. ड्रग्स बाळगल्याप्रकरणी 2018 मध्ये देखील एजाजला अटक करण्यात आली होती. 

टॅग्स :नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो