Join us  

'माझी तुझी रेशीमगाठ'मधील या अभिनेत्रीला एका गुंड मुलाने केलं होतं प्रपोज, पुढे घडलं ते खूपच होतं धक्कादायक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 7:00 AM

'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazi Tuzi Reshimgath) मालिका सुरूवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

माझी तुझी रेशीमगाठ मालिका सुरूवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. नेहा आणि यश यांची वेगळी केमिस्ट्री या मालिकेतून पाहायला मिळत आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत मला ५०० कोटीवाला नवरा हवाय म्हणणारी शेफालीला देखील चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. खरेतर या मालिकेआधी तिने डॉक्टर डॉन या मालिकेत काम केले आहे. माझी तुझी रेशीमगाठमधील शेफाली अभिनेत्री काजल काटे हिने साकारली आहे. सध्या ती चांगलीच चर्चेत आली आहे. पण यावेळी तिचे चर्चेत येण्याचे कारण हे तिचा अभिनय नसून तिच्या आयुष्यातीलच काही भयानक आणि काही मजेशीर प्रसंग आहेत.

एका मुलाखतीत काजल काटे हिने तिच्या आयुष्यातील काही प्रसंगांबद्दल सांगितले. यामध्ये तिच्या आयुष्यातील सायकलीचा प्रसंग फारच भयानक होता असं ती म्हणते. काजल ७ वी इयत्तेत असताना ती शाळेत जाण्यासाठी सायकलने प्रवास करायची. तर एक दिवस तिच्याकडे असलेल्या सायकलीच्या बकेटमध्ये एका मुलाने एक प्रेम पत्र आणि काही फुलं ठेवून तिला प्रपोज केलं होतं. काजलला तो मुलगा काही आवडत नव्हता. कारण तो एक गुंड होता. त्यामुळे तिने ती फुलं आणि प्रेम पत्र फाडले आणि तिथेच टाकून ती निघून घेली. आता हा सर्व प्रकार त्या मुलाने पाहिला आणि त्याला नकार दर्शवल्यामुळे काजलला आता धडा शिकवयचा त्याने ठरवले. त्याने एका मुलाला सांगून तिच्या सायकलचा अपघात घडवून आणला होता. त्यामुळे हे प्रकरण चांगलंच गंभीर झाले होते असे तिने सांगितले. 

सायकलीचा आणखी एक सांगितला किस्सात्यानंतर तिच्या सायकलीच्या आठवणींशी संबंधित तिने आणखी एक किस्सा सांगितला. ती म्हणाली की, माझ्या नवऱ्याने मला एक सायकल गिफ्ट केली आहे. माझे वजन कमी व्हावे म्हणून त्याने मला ही सायकल दिली. पण खरेतर ती सायकल घेऊन आता ३ वर्षे झाली आहेत. पण आता पर्यंत फक्त ३० दिवस मी ती सायकल चालवली आहे. पण आता मात्र तिला आपलं वजन मुळीच कमी करायचे नाही आहे. तिला माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेसाठी आहे तसाच राहायला सांगितलं आहे. पण मालिका संपल्यावर मी पुन्हा वजन कमी विचार करेन असे देखील ती सांगते.  काजल काटे हिच्या नवऱ्याचे नाव प्रतीक कदम असून तो मुंबई इंडियन्स या आयपीएल सामन्यातील टीमचा तो एक महत्वाचा भाग आहे. प्रतीक गेली कित्तेक वर्ष मुंबई इंडियन्स टीमला फिटनेसचे प्रशिक्षण देतो आहे.