Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेता नमित खन्नाला आहे 'या' गोष्टीची आवड !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2018 11:04 IST

मॉडेलमधून अभिनेता झालेला नमित खन्ना ‘ये प्यार नहीं तो क्या है’ मालिकेत सिद्धान्त सिन्हा ही व्यक्तिरेखा साकारत आहे. या ...

मॉडेलमधून अभिनेता झालेला नमित खन्ना ‘ये प्यार नहीं तो क्या है’ मालिकेत सिद्धान्त सिन्हा ही व्यक्तिरेखा साकारत आहे. या मालिकेत तो एका वकिलाची भूमिका करत असून मालिकेत त्याला बाइक चालवताना दाखवले आहे. आणि अलीकडेच ही गोष्ट उघड झाली आहे की, त्याला बाइक्सचे वेड आहे. आपली आवड पूर्ण करण्यासाठी त्याला एक बाइक घेण्याची पूर्वीपासून खूप इच्छा होती पण काही कारणांमुळे ते होऊ शकले नव्हते. ‘ये प्यार नहीं तो क्या है’ मालिकेत त्याचे हे स्वप्न पूर्ण होत आहे. नमित साकारत असलेल्या व्यक्तिरेखेला त्याची बाइक दुरुस्त करण्याचे आव्हान देण्यात येणार आहे, आणि जर तो त्यात यशस्वी झाला तर त्याने ते छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट करायचे अशी अट आहे. प्रत्यक्ष जीवनात नमित आपल्या गाड्यांची खूप चांगली काळजी घेतो आणि दुचाकी वाहने चांगल्या स्थितीत ठेवणे त्याला आवडते.नमितने सांगितले की, खूप लहान वयात तो बाइक चालवू लागला होता आणि गाडी चालवताना संपूर्ण सुरक्षेची काळजी देखील तो घेतो. तो म्हणाला, “मी आवड म्हणून माझी बाइक चालवतो आणि ‘ये प्यार नहीं तो क्या है’ मध्ये मी बाईक चालवताना दिसणार आहे. मला माझ्या कॉलेजच्या दिवसांत एनफील्ड घ्यायची होती पण जोखमींचा विचार करून माझ्या आई-वडिलांनी मला ती गाडी घेण्याची परवानगी दिली नाही. बहुधा माझे तेच स्वप्न आता पूर्ण होत आहे!” मालिकेच्या क्रू सदस्यांना नमित बर्‍याचदा बाइकचालवताना दिसतो यातून त्याचे या गाडीबद्दलचे प्रेम दिसून येते.सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘ये प्यार नहीं तो क्या है’ मालिकेत पलक जैन आणि नमित खन्नाला प्रेक्षकांकडून आणि मनोरंजन उद्योगातील इतर कलाकारांकडून खूप प्रशंसा मिळत आहे. ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेला आणि या मालिकेतील व्यक्तिरेखांना प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे.