Join us  

44 वर्षांची शमिता शेट्टी घटस्फोटित अभिनेत्याला डेट करतेय?, किसिंग व्हिडीओ मागचं सत्य आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 12:21 PM

दोघांचा किसिंग व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा सुरु झाली होती.

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता आमिर अली त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. 'एफआयआर', 'दिल्ली वाली ठाकूर गर्ल्स', 'सरोजिनी-एक नई पहल' यांसारख्या शोमध्ये आपल्या दमदार अभिनयाने आमिर अलीने  लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. बॉलिवूड अभिनेत्री आणि बिग बॉसची स्पर्धक शमिता शेट्टी हिच्यासोबतच्या डेटिंगच्या अफवांवर मौन सोडलं आहे.  

होय, काही महिन्यांपूर्वी तो अभिनेत्रीसोबत अनेकदा स्पॉट झाला होता, त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या अफवा पसरू लागल्या होत्या. दोघांचा किसिंग व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा सुरु झाली होती. आता या अभिनेत्याने या अफवांवर मौन सोडले आणि तो म्हणाले, "जेव्हा मी कोणासोबत ही बाहेर जातो तेव्हा माझ्या लिंक अप स्टोरीज येऊ लागतात. मी सिंगल आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही सगळ्यांशी माझं नावं जोडाल. मला आठवतं की मी माझ्या काही मित्रांसोबत जेवायला गेलो होतो आणि त्याच रेस्टॉरंटमध्ये भारतीय संघ कोणाचा तरी वाढदिवस साजरा करत होता. त्या दरम्यान माझी एक मैत्रिण आली किंवा ती निघून गेली आणि मी तिला सोडायला गेलो. अचानक दुसऱ्या दिवशी माझ्या मित्राने मला कॉल केला आणि सांगितले की मी ऐकले आहे की तू तिला डेट करत आहेस आणि तिने मला youtube लिंक देखील पाठवली.

तो पुढे म्हणाला, "मी सिंगल आहे म्हणून मी कोणाला डेट करत नाही. मी आणि शमिता चित्रपट पहायचो पण आता आम्ही एकत्र पाहणं बंद केलं आहं. आम्ही अजूनही मित्र आहोत पण आम्ही कुठेही बाहेर जात नाही. आता मी जास्त विचार करत नाही कारण मी केला तर आयुष्य जगणं कठीण होईल. 

दुसरीकडे, आमिर अलीनेची एक्स वाईफ संजीदा शेख हर्षवर्धन राणेला डेट करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. दोघांच्या सिक्रेट व्हेकेशनचे फोटो व्हायरल झाले आहेत, त्यामुळे चाहते हे अफेअर खरे मानू लागले. अभिनेता आमिर अलीसोबत घटस्फोट घेतल्याचे सांगितले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. कारण दोघेही टीव्हीच्या लोकप्रिय जोडप्यांपैकी होते. दोघांनाही एक लाडकी मुलगी आहे. तिचा संभाळ  संजीदा शेख ही सिंगल मदर म्हणून करतेय.   

टॅग्स :आमिर अली